ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईतील 96 टक्के रस्त्यांची चाळण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 19, 2019 04:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईतील 96 टक्के रस्त्यांची चाळण

शहर : मुंबई

मुंबईतील तब्बल 96 टक्के रस्ते खराब स्थितीत असल्याचे रस्ते पाहणी समितीच्या पाहणीत समोर आले आहे.पावसाळ्यात मुंबईकरांकडून खराब रस्त्यांच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर मुंबई महापालिकेने मुंबईतील विविध भागांमधील 184 रस्त्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी रस्ते पाहणी समिती स्थापन करण्यात आली होती. रस्त्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी केलेल्या आठवडाभरानंतरच्या तपासणीनंतर 184 रस्त्यांपैकी तब्बल 177 रस्त्यांची स्थिती खराब असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रस्त्यांची स्थिती खराब असल्याचे लक्षात येताच मुंबई महानगरपालिकेने रस्ते कंत्राटदारांना नोटीसा बजावण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ते कंत्राटदाराने हमी दिलेल्या रस्त्याची कालावधीपूर्वीच अवस्था बिकट झाली आहे. निविदांमधील अटी आणि नियमांनुसार, कंत्राटदाराने रस्ते बांधणीनंतर तीन वर्षांपर्यंत काळजी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे रस्त्याच्या खराब स्थितीला कारणीभूत असल्यामुळे 26 कंत्राटदारांना नोटीस पाठविण्यात येणार आहे.

मागे

मतदानाच्या दिवशी राज्यात वादळी पावसाचा अंदाज
मतदानाच्या दिवशी राज्यात वादळी पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने (IMD)दिलेल्या अंदाजानुसार मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुण....

अधिक वाचा

पुढे  

ठाकुरांना उच्च न्यायालयाचा दणका ! गोरेगावच्या जनतेचा विजय!
ठाकुरांना उच्च न्यायालयाचा दणका ! गोरेगावच्या जनतेचा विजय!

 विद्या ठाकूरांच्या ‘व्हिनस’च्या तावडीतून मैदान मुक्त...... ‘क्रिकेट....

Read more