ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हिंजवडी येथे किरकोळ भांडणानंतर कामगाराचा गळा दाबून खून

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 05:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

हिंजवडी येथे किरकोळ भांडणानंतर कामगाराचा गळा दाबून खून

शहर : पुणे

हिंजवडी येथे किरकोळ भांडणानंतर एका कामगाराचा गळा दाबून खून केल्याची घटना  म्हाळूंगे चौकाजवळील पुराणिक कॅम्प येथे गुरुवारी रात्री घडली.  रविंद्र साहू (26) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविंद्र हा मूळचा झारखंडचा असू तो कामानिमित्त पुण्यात आला होता. म्हाळुंगे चौकाजवळ एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. त्या साईटच्या लेबर कॅम्पमध्ये रविंद्र राहत होता. गुरुवारी त्याचे त्यांच्या सहकार्‍यांशी भांडण झाले होते. त्यानंतर टॉवेलच्या सहाय्याने गळा आवळून रविंद्र याचा खून करण्यात आला. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला असून हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मागे

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ’बाजीराव’चा मृत्यू
बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ’बाजीराव’चा मृत्यू

बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पांढर्‍या वाघाने सर्वांच....

अधिक वाचा

पुढे  

जेट कर्मचार्‍यांचा न्याय्य हक्कासाठी लाँग मार्च
जेट कर्मचार्‍यांचा न्याय्य हक्कासाठी लाँग मार्च

मुंबईत जेट एअरवेजच्या रोजगार गमावलेल्या कर्मचार्‍यांचा तिढा सुटण्याची क....

Read more