ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

देवेंद्र फडणवीस यांना नागपूरच्या सत्र न्यायालयाचे समन्स

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 29, 2019 10:49 AM 2019-02-12T14:15:30+5:30

देवेंद्र फडणवीस यांना नागपूरच्या सत्र न्यायालयाचे समन्स

शहर : नागपूर

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नागपूरच्या सत्र न्यायालयाने समन्स बजावले आहे. हे समन्स नागपूर पोलिसांच्या पथकाने फडणवीस यांना दिले आहे. निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्यावर असलेले दोन गुन्हेगारी स्वरूपाच्या खटल्यांची माहिती लपवल्याचा ठपका फडणवीस यांच्यावर आहे. त्याबाबत हे समन्स बजावण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी सांगितले, पोलिसांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावण्यात आले आहेत. त्यांच्यावर दोन गुन्हेगारी प्रकरणांची माहिती लपवल्याचा आरोप आहे. या आरोपाप्रकरणी स्थानिक न्यायालयाने समन्स बजावले. त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. असे वृ्त्त एएनआयने दिले आहे.

का आहे हे प्रकरण?

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत देण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वत: वर चालवलेल्या दोन फौजदारी खटल्यांची माहिती दिली नसल्याचा आरोप फडणवीस यांच्यावर करण्यात आला. याचिकाकर्त्याने असा दावा केला की, फडणवीस यांनी असे करून लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १२५ चे उल्लंघन केले. यासंदर्भात खालच्या न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने म्हटले होते की, फडणवीस यांच्या विरोधात प्रथमदर्शनी कोणताही दावा दाखल केला जाऊ शकत नाही. याचिकाकर्त्याने असे म्हटले होते की, उमेदवाराने सर्व फौजदारी खटल्यांबद्दल माहिती देणे कायदेशीररित्या अनिवार्य आहे.

यावर फडणवीस सरकारने हे स्पष्ट केले की, पहिले प्रकरण बदनामीचे आहे, ज्यात होईकोर्टने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलासा दिला. त्याचवेळी, दुसरी घटना झोपडपट्टी मालमत्तेवरील कराबाबत आहे. ही दोन्ही प्रकरणे लोकहिताची होती, त्यामध्ये वैयक्तिक स्वारस्य नव्हते. नंतर याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात संपर्क साधला आणि ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला आणि या प्रकरणात फडणवीस यांना खटला चालवण्याचे आदेश दिले.

 

 

मागे

पाकिस्तानात निषेधाचे होर्डिंग्ज, संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ
पाकिस्तानात निषेधाचे होर्डिंग्ज, संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. कल....

अधिक वाचा

पुढे  

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पदभार स्वीकारणार
महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पदभार स्वीकारणार

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रि....

Read more