ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पदभार स्वीकारणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 29, 2019 10:53 AM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पदभार स्वीकारणार

शहर : मुंबई

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज ते मंत्रालयात मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. आजपासून महाराष्ट्र विकासआघाडीच्या कारभाराला सुरुवात होणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यासोबत शपथ घेतलेले मंत्रीही आज आपल्या कार्यालयाचा पदभार स्वीकारणार आहेत. मुख्यमंत्री ठाकरे हे शेतकऱ्यांसंदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर म्हणालेत, मी एक चांगले सरकार देऊ, असे राज्यातील जनतेला मी आश्वासन देऊ इच्छित आहे. मला अशा पद्धतीने मदत करायची आहे ज्यामुळे ते आनंदी होतील.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिवतिर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी देशातील अनेक दिग्गज नेते मंचावर उपस्थित होते. हा सोहळा अनेक अर्थांनी ऐतिहासिक असा होता. शिवाजी पार्कवर झालेल्या या भव्य सोहळ्याला देशभरातले राजकीय नेते एकत्र आलेच होते पण त्याचवेळी उद्योगक्षेत्रातले मान्यवर आणि बॉलिवूड कलाकारही अवतरले होते. व्यासपीठावर देशाच्या राजकारणातल्या नव्या राजकीय समीकरणांची नांदी झालेली पाहायला मिळत होती. उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे यांना व्यासपीठावर अगदी पहिली मानाची जागा देण्यात आली होती. त्यांच्या शेजारी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी होते. जोशींच्या शेजारी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांच्या शेजारी ही सर्व समीकरणं जुळवून आणणारे, नव्या राजकीय नाट्याचे नेपथ्यकार शरद पवार विराजमान होते.

शिवसेनेची या काळातली मुलुखमैदान तोफ अशी ख्याती मिळवलेले संजय राऊत, कमलनाथ आणि राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांची एकत्र पोझ चर्चेचा विषय होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही सोहळ्याला उपस्थित होते. सुप्रिया सुळे यांचं राजकीय वजन वाढल्याचं गेल्या काही दिवसांत दिसून येते आहे.

राजकीय सत्तापटलावर विरोधकांसोबतच अजित पवारांना समजावण्यातही सुळेंचा वाटा महत्त्वाचा राहिलाय. व्यासपीठावर डीएमकेचे स्टॅलिन असतील, काँग्रेसचे कमलनाथ असतील. सर्वांचं स्वागत करण्यात सुप्रिया सुळे आघाडीवर होत्या. अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेले छगन भुजबळ हे समीकरणही चर्चेचा विषय होतं. भगव्या रंगाचा कुर्ता परिधान केलेल्या उद्धव ठाकरेंची एन्ट्री एकदम ग्रँड होती. व्यासपीठावर नीता अंबानींनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. नीता अंबानींनी आदित्य ठाकरेंशी अगत्याने साधलेला संवादही पाहण्यासारखाच होता. शिवाजीपार्कवर भव्य संख्येने उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी अक्षरशः दंडवत घातला.

 

 

मागे

देवेंद्र फडणवीस यांना नागपूरच्या सत्र न्यायालयाचे समन्स
देवेंद्र फडणवीस यांना नागपूरच्या सत्र न्यायालयाचे समन्स

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नागपूरच्या सत्र न्यायालयाने स....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर रसायनीजवळ भीषण अपघात,चार ठार
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर रसायनीजवळ भीषण अपघात,चार ठार

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर रसायनीजवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जण....

Read more