ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 25, 2020 09:18 AM 2019-02-12T14:15:30+5:30

आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण

शहर : नागपूर

नागपूर महानगरपालिकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी आणि या विषाणूचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करणाऱ्या आणि शासकीय यंत्रणेचा कारभार मोठ्या जबाबदारीनं सांभाळणाऱ्या पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द मुंढे यांनीच ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

'माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे', असं म्हणत आपल्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळली नसल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या काळात नियमांप्रमाणं आपण विलगीकरणात राहणार असून, मागील १४ दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच कोरोना चाचणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असली तरीही यापुढील काही दिवस आपण घरुनच कामकाज पाहणार असून, कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी काम करत राहू अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली. नागपूरमधील परिस्थिती हाताळण्यासाठी या काळातही आपण काम करतच राहू अशी हमी देत त्यांनी, आपण कोरोनासोबतचा हा लढा नक्कीच जिंकू असा विश्वासही व्यक्त केला.

मागे

महाड शहरात ५ मजली इमारत कोसळली, शेकडो लोकं ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
महाड शहरात ५ मजली इमारत कोसळली, शेकडो लोकं ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

महाड शहरात पाच मजली ईमारत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. काजलपूरा भागात अस....

अधिक वाचा

पुढे  

विसर्जनासाठी हौद म्हणून कचरापेट्यांचा वापर; पोलिसांत तक्रार दाखल
विसर्जनासाठी हौद म्हणून कचरापेट्यांचा वापर; पोलिसांत तक्रार दाखल

ज्या पुण्यामधून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहुर्तमेढ रोव....

Read more