ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एस. टी. सवलतीसाठी गोलमाल केलेली २५ आधारकार्ड जप्त

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 26, 2019 04:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एस. टी. सवलतीसाठी गोलमाल केलेली २५ आधारकार्ड जप्त

शहर : रत्नागिरी

          राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर नोंदणी प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. मात्र, ही सवलत मिळवण्यासाठी वय वाढवून बोगस आधारकार्ड तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चिपळुणात आतापर्यंत अशी 25 बोगस आधारकार्ड जप्त करण्यात आल्याने आधारकार्डच्या ‘गोलमाल’वर शिक्कामोर्तब होत आहे.

         पूर्वी एसटी बसने प्रवास करताना ज्येष्ठ मंडळींना सवलत मिळण्यासाठी मतदान कार्ड, आधारकार्ड सोबत बाळगावे लागत होते. सुरक्षित प्रवास म्हणून अनेक प्रवासी अजूनही बसलाच पसंती देतात. त्यामुळे प्रवासात पैशाची अडचण राहू नये, तसेच कागदी पासऐवजी महामंडळाकडून बँक व आधार क्रमांकाशी जोडलेले अत्याधुनिक ‘स्मार्ट कार्ड’ देण्याचा निर्णय घेतला. कार्डसाठी 55 रूपये शुल्क भरून प्रत्येक आगारातील पास तसेच आरक्षण केंद्रात ते देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या सात महिन्यांपासून या कार्डची नोंदणी आणि वितरण सुरू आहे.

           बनावट कागदपत्रे दाखवून 60 वर्षे पूर्ण झाले असे सांगत बस प्रवास करणारे अनेक प्रवासी असतात. यामुळे ज्येष्ठ मंडळींना मतदान कार्ड, आधारकार्ड सोबत बाळगावे लागत होते. मात्र आता देण्यात येणाऱया स्मार्ट कार्डवर पासधारकाचे नाव, सवलतीचा तसेच बसचा प्रकार, प्रवासाचे अंतर, प्रवास सवलतीची मुदत अशा स्वरूपाची माहिती नमूद असणार आहे. हे कार्ड संबंधित सवलतधारकांच्या आधार क्रमांकाशी जोडले असल्याने खरे वय समजणे सोपे जात असल्याने स्मार्टकार्ट नोंदणीवेळी आधारकार्डची बोगसगिरी उजेडात येत आहे.

          चिपळुणात आगारात जूनमध्ये नोंदणी सुरू झाली. ऑगस्टपासून त्याला गती आली असून 8 हजाराहून अधिक नागरिकांनी नोंदणी केली आहे. दरम्यान, नोंदणीवेळी ज्या आधारकार्डची प्रत दाखवली जात आहे, त्यावरील जन्मदिनांक आणि मशिनवर अंगठय़ाचा ठसा घेतल्यानंतर दिसणारे मूळ आधारकार्ड यात तफावत दिसत असल्याचे निदर्शनात येत आहे. आधारकार्ड बोगसगिरीमुळे अधिकारीही चक्रावून गेले आहेत. आतापर्यंत 25हून अधिक आधारकार्ड बोगस सापडले असून ती जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये काहींनी तर आपले वय चक्क 20 वर्षाने वाढवून घेतल्याचे पुढे आले आहे.

          आधारकार्ड ही काही घरी तयार करण्यासारखी वस्तू नाही.  फोटो कॉपी पेस्ट करून त्यात हे बदल केले जात असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे अशी बोगसगिरी करणारे रॅकेट असावे का या दिशेने तपास करणे गरजेचे आहे. आगाराने बोगस आधारकार्ड आपल्याकडे ठेऊन घेतली असली तरी त्याची पुढील चौकशीच्यादृष्टीने कोणतीही पावले उचललेली दिसत नाहीत.

           या प्रकाराबाबत आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आतापर्यंत सुमारे 25पर्यंत आधारकार्ड नोंदणीवेळी बोगस आढळली आहेत. ती आमच्या ताब्यात असून संबंधितांना याबाबत समज देण्यात आली आहेत. एस.टी. प्रवासात या बोगस आधारकार्डबाबत वाहकानाही सूचना देण्यात आल्या आहेत.
 

मागे

कांदा आणखी काही दिवस ग्राहकांना रडवणार
कांदा आणखी काही दिवस ग्राहकांना रडवणार

          पुणे - कांद्याचे वाढलेले दर आणखी काही दिवस वधारलेलेच असणार आहे....

अधिक वाचा

पुढे  

समुद्रात गाडी धुणे पडले महागात
समुद्रात गाडी धुणे पडले महागात

             रत्नागिरी - समुद्राच्या पाण्यात गाडी धुण्याचा अतिउत्साह....

Read more