ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शेअर बाजारात मोठी पडझड, आतापर्यंत २० लाख कोटींचे नुकसान

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 13, 2020 11:47 AM 2019-02-12T14:15:30+5:30

शेअर बाजारात मोठी पडझड, आतापर्यंत २० लाख कोटींचे नुकसान

शहर : मुंबई

शेअर बाजारातला आठवड्याचा आजचा शेवटचा दिवस कोरोना व्हायरस संकटामुळे, भारतीय शेअर बाजारासाठी आणखी एक वाईट दिवस ठरण्याची शक्यता आहे. युरोप, अमेरिका आणि आशियातील सर्व बाजारांत आज सकाळी मोठ्या घसरणीचे सत्र कायम राहिले आहे. जपान आणि अमेरिकेत घसरण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत २० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जपानची राजधानी टोकियोमधील शेअर बाजार टक्क्यांनी कोसळला. तर अमेरिका आणि युरोपियन बाजारात ऐतिहासिक पडझड झाली. गुरुवारी भारतीय बाजारात विक्रमी पडझडीमुळे गुंतवणूकदारांनी ११लाख कोटी गमावले. या आठवड्यात सोमवारपासून आतापर्यंत गुंतणूकदारांच्या जवळपास २० लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे. आजही पुन्हा पडझडीचाच अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेअर बाजारात चिंतेचे वातावरण आहे.

शेअर बाजारातील निर्देशाकांमध्ये ऐतिहासिक घसरण पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरस संसर्ग ही साथ असल्याची जागतिक आरोग्य संघटनेची घोषणा केली आहे. यानंतर ब्रिटन वगळता इतर सर्व युरोपीय देशांमधून येणाऱ्या पर्यटकांना अमेरिकेत प्रवेशबंदी घातलण्यात आली आहे. यामुळे जागतिक मंदीची शक्यतेची चर्चा या सर्वांचा परिणाम आज जागतिक शेअर बाजारांवर दिसून आला.

भारतीय बाजारातही मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल हजार ९१९ अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी तब्बल ८६८ अंकांनी घसरला. एकाच दिवसात झालेली आतापर्यंतची ही सर्वात मोठी घसरण आहे. दोन्ही निर्देशांक टक्क्यांहून अधिक कोसळले. स्टेट बँक, ओएनजीसी, एक्सिस बँक,आयटीसी, टीसीएस, टायटन, एल अँड टी या कंपन्यांचे समभाग ते १३ टक्क्यांपर्यंत घसरले होते.

मागे

वादानंतर इंदोरीकर महाराजांचं समर्थकांना नम्र आवाहन
वादानंतर इंदोरीकर महाराजांचं समर्थकांना नम्र आवाहन

समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी या वक्तव्यावरुन वादात सापडलेल्या इंद....

अधिक वाचा

पुढे  

अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार - अजित पवार
अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार - अजित पवार

काम न करता, शासकीय तिजोरीतून निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल ....

Read more