ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वडिलांचे निधन झाले तरी अधिकारी ६ दिवस कार्यालयातच अडकले

By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 01, 2020 01:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वडिलांचे निधन झाले तरी अधिकारी ६ दिवस कार्यालयातच अडकले

शहर : delhi

           नवी दिल्ली : काही बाबतीत नियम इतके कठोर असतात की, अशावेळी भावनेला महत्व नसते. सीमेवरील जवान हे त्याचेच एक उदाहरण आहे. तर केंद्रीय अर्थमंत्रालयातही असेच काही नियम आहेत. त्यामुळे अर्थसंकल्प सादर होईपर्यंत तेथील प्रमुख अधिकार्‍यांना ४-५ दिवस कार्यालय सोडता येत नाही. इतकेच काय पण घरातील कुटुंबासह कुणालाही संपर्क साधता येत नाही. या नियमाचा फटका अर्थ मंत्रालयाच्या प्रेस विभागात उपव्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या कुलदीप शर्मा यांनाही बसला आहे. आज १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करीत आहेत. परंतु २६ जानेवारीला शर्मा यांच्या वडिलांचे निधन झाले, पण नियमांमुळे शर्मा यांना १ फेब्रुवारीपर्यंत बाहेर पडता आले नाही. 

       अर्थसंकल्पाची प्रक्रिया सर्वसाधारणपणे सप्टेंबरपासून सुरू होते. ती साधारण ६ महीने चालते. अर्थसंकल्पाचा दस्तऐवज छापण्याची प्रक्रिया हलवा बनविण्याच्या कार्यक्रमापासून सुरू होते. हलवा बनविण्याच्या कार्यक्रम २० जानेवारीला झाला होता. त्यानंतर अर्थसंकल्प प्रक्रियेशी संबंधित अधिकारी कर्मचारी मंत्रालयातच राहतात. अर्थसंकल्प सादर होण्याच्या दोन दिवस आधी मंत्रालय सील केले जाते. अर्थसंकल्प बनविणार्‍या टीमला 'बजेट कोअर ग्रुप' असे संबोधले जाते. यात सर्व विभागांचे सचिव आणि मुख्य आर्थिक सल्लागार यांचा समावेश असतो. या ग्रुपच्या अख्त्यारित ५० लोक कार्यरत असतात. त्यांचे नेतृत्व महसूल विभागाच्या सचिवांकडे असते. अर्थसंकल्पाचे दस्तऐवज गोपनिय असतात. ते तयार करण्याच्या प्रक्रियेतील उच्च अधिकार्‍यांपासून त्यांच्या हाताखालील कर्मचारी, स्टेनोग्राफर्स, टाईपरायटर्स, प्रिंटिंग प्रेसचे कर्मचारी आणि इतर लोक कार्यालयातच राहतात. या काळात त्यांना स्वतःच्या कुटुंबियांसमवेत बोलण्याचीही परवानगी नसते. अर्थसंकल्प तयार करणारे आणि त्याचे प्रकाशन करणारे, कडक देखरेखीखाली असतात. यात अर्थमंत्र्यांचे भाषण सर्वात सुरक्षित दस्तऐवज असतो. अर्थसंकल्पाचा केवळ दोन दिवस आधीच त्याची छपाई केली जाते.        


 

मागे

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी खास उपाय
कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी खास उपाय

सध्या चीनमधून आलेल्या कोरोना व्हायरसची चर्चा सर्वत्र रंगत आहे. आतापर्यंत य....

अधिक वाचा

पुढे  

Budget 2020 : बँक डुबली तर ग्राहकांना मिळणार पूर्वीपेक्षा जास्त पैसे
Budget 2020 : बँक डुबली तर ग्राहकांना मिळणार पूर्वीपेक्षा जास्त पैसे

बॅंक घोटाळ्यांच्या बातम्या आल्यानंतर बँकांवर आरबीआय निर्बंध लादते. त्याम....

Read more