ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एसटीची बोरीवली ते व्हाया मुंबई विमानतळ बससेवा सुरू होणार ?

By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 07, 2019 03:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एसटीची बोरीवली ते व्हाया मुंबई विमानतळ बससेवा सुरू होणार ?

शहर : मुंबई

महाराष्ट्र राजया मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी बोरीवली ते पुणे व्हाया मुंबई विमानतळ अशी वातानुकूलित बससेवा सुरू करण्याची शक्यता आहे. यासाठी एसटी महामंडळाची मुंबई विमानतळ प्राधिकरणाशी चर्चाही सुरू आहे. अशी सेवा सुरू झाल्यास ज्या प्रवाशांना खाजगी व टॅक्सी सेवेवर अवलंबून राहावे लागते त्यांना मोठा दिलासा मिळेल.

त्याचबरोबर मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला येथूनही पुण्यासाठी गाड्या सुटतात. त्यांचीही जोडणी राष्ट्रीय मुंबई विमानतळाला देण्यात येऊ शकते का ? याचीही चाचपणी केली जातेय. बोरीवलीतून शिवनेरीच्या 12 फेर्‍या पुण्याकडे होतात, यापैकी काही फेर्‍या या मुंबई विमानतळाच्या मार्गे जोडल्या जाऊ शकतात. पुण्याखेरीज आणखी कोणत्या शहरात प्रवाशी जातात त्या दिशेने देखील सेवा देण्याचा विचार एसटी महामंडळ करीत आहे. 

मागे

खास महिलांसाठी धावणार बेस्टची ‘तेजस्विनी’ बस
खास महिलांसाठी धावणार बेस्टची ‘तेजस्विनी’ बस

बेस्टने कास महिला प्रवाशासांठी तेजस्विनी बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आह....

अधिक वाचा

पुढे  

कांद्याने केली शंभरी पार
कांद्याने केली शंभरी पार

परतीच्या पावसाने महाराष्ट्रासह, कर्नाटक आणि इतर राज्यातील शेतीच्या उत्पा....

Read more