ठळक बातम्या तिखट भाकरी.    |     शेवभाजी.    |     मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे.    |     कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते.    |     प्रगतीत अडथळा आणतात कार्यालयाशी संबंधित या गोष्टी.    |    

बेसन चिक्की

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 09, 2019 07:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बेसन चिक्की

शहर : मुंबई

साहित्य -: वाटी डाळीचं पीठ, 00 ग्रॅम मावा, टे. स्पू. खसखस, वेलची-जायफळ पूड, १५0 ग्रॅम साखर, अर्धी वाटी पाणी, केशरी रंग, ड्रायफ्रूटस्चे काप आणि तूप.

कृती -: डाळीच्या पिठात टे. स्पू. तुपाचं मोहन घालून ते घट्ट भिजवून ठेवावं. मग त्याची पोळी लाटून किंवा पुर्या लाटून तुपात तळून घ्याव्यात. पुर्या कुरकुरीत तळून मोडून घ्याव्या. नंतर मिक्सरमध्ये फिरवून त्याचा रवा करावा. मावा परतून रव्यात टाकावा. खसखस भाजून घ्यावी, साखरेत पाणी घालून त्याचा दोन तारी पाक तयार करावा. त्यात केशरी रंग घालावा. पाक तयार झाला की रव्याचं मिश्रण, खसखस आणि ड्रायफ्रूटस्चे काप त्यात टाकून मिश्रण चांगलं एकजीव करावं. बर्फीच्या ट्रेला तुपाचा हात फिरवून त्यात हे मिश्रण ओतावं. ते ट्रेमध्ये एकसारखं पसरवून ठेवावं. ते - तास तसंच राहू द्यावं आणि नंतर त्याच्या वड्या पाडाव्यात.

 

मागे

मिक्स धान्यांच्या चकल्या
मिक्स धान्यांच्या चकल्या

साहित्य -: हरभरे, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मूग, मटकी, चवळी, मसूर, वाल, तूरडाळ, धने, ती....

अधिक वाचा

पुढे  

चण्याच्या डाळीचे लाडू
चण्याच्या डाळीचे लाडू

साहित्य -: चण्याची डाळ - १ वाटी साखर, १ ते सव्वा वाटी नारळ खवलेला, पाऊण वाटी तूप, ....

Read more