" /> " /> " />
ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चौथ्या व अंतिम टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणातील ६४ उमेदवारांवर गंभीर गुन्हे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 25, 2019 07:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चौथ्या व अंतिम टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणातील ६४ उमेदवारांवर गंभीर गुन्हे

शहर : मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील चौथ्या अंतिम टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणातील ३२० उमेदवारांपैकी ६४ उमेदवारांविरुद्ध (२०%) गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. एका उमेदवाराने खुनाचा, उमेदवारांनी खुनाच्या प्रयत्नाचा, १० जणांवर महिलांविरुद्ध अत्याचाराचे, उमेदवारांविरुद्ध अपहरणाचे तर उमेदवारांवर चोरी, दरोड्यासारखे गुन्हेही दाखल आहेत. महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थांनी महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यात १७ मतदारसंघातील ३२३ पैकी ३२० उमेदवारांच्या शपथपत्रांमधील बाबींचे विश्लेषण केले असून त्यातून ही माहिती पुढे आली आहे.

३२० पैकी ८९ (२८%) उमेदवारांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हेगारी प्रकरणांची माहिती दिली आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ६४ उमेदवारांपैकी दोघांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध असल्याचे जाहीर केले आहे. वंचित आघाडीचे नाशिक मतदारसंघातील उमेदवार पवन चंद्रकांत पवार यांनी त्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती दिली आहे. तर तीन उमेदवारांनी त्यांच्या विरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असल्याचे जाहीर केले आहे. उमेदवारांवर सांप्रदायिक आणि द्वेषयुक्त भाषण केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

 

३४% उमेदवार कोट्यधीश

 

३२० पैकी १०९ उमेदवार (३४%) कोट्यधीश. वंचित आघाडीचे बसपचे प्रत्येकी उमेदवार कोट्यधीश. उमेदवारांकडे सरासरी .४७ कोटींपेक्षा जास्त मालमत्ता.

 

गंभीर गुन्हे दाखल

 

वंचित आघाडीच्या , बसपच्या , शिवसेनेच्या , काँग्रेसच्या पैकी , भाजपच्या पैकी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पैकी उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

61 लाखांचे सरासरी कर्ज सर्व उमेदवारांवर

 

  • 66 लाख सरासरी कर्ज भाजप उमेदवारांवर
  • 7.92 कोटी सरासरी कर्ज काँग्रेसच्या उमेदवारांवर
  • 4.19 कोटी सरासरी कर्ज राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर
  • 1.88 कोटी सरासरी कर्ज शिवसेनेच्या उमेदवारांवर

 

पक्षनिहाय सरासरी मालमत्ता

 

  • 40.02 कोटी काँग्रेस

 

  • 21.09 कोटी राष्ट्रवादी

 

  • 20.14 कोटी शिवसेना
  • 9.87 कोटी वंचित आघाडी
  • 17.23 कोटी भाजप
  • 1.22 कोटी बसप

मागे

अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा; सरकारी नोकऱ्यांमध्ये ८५ टक्के आरक्षण
अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा; सरकारी नोकऱ्यांमध्ये ८५ टक्के आरक्षण

आगमी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अर....

अधिक वाचा

पुढे  

भाजप देणार ‘लाव रे तो व्हिडिओ’ ला उत्तर - विनोद तावडे
भाजप देणार ‘लाव रे तो व्हिडिओ’ ला उत्तर - विनोद तावडे

लोकसभा निवडणुकीला सामोरे न जाता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अम....

Read more