ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा; सरकारी नोकऱ्यांमध्ये ८५ टक्के आरक्षण

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 25, 2019 04:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा; सरकारी नोकऱ्यांमध्ये ८५ टक्के आरक्षण

शहर : मुंबई

आगमी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी त्यांनी एक मोठी घोषणा केली. त्यानुसार आगामी काळात दिल्लीतून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ८५ टक्के आरक्षण देण्यात येईल. तर, सध्याच्या घडीला दिल्लीतील सरकारी नोकऱ्यांमध्ये राज्याबाहेरून आलेल्या लोकांचे प्रमाण जास्त आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी दिल्लीतून शिक्षण घेणाऱ्यांना नोकऱ्यांमध्ये ८५ टक्के आरक्षण देणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी यंदाची लोकसभा निवडणूक ही देशाला वाचवण्यासाठीची निवडणूक असल्याचे म्हटले. भारताने आजपर्यंत अनेक हल्ले सहन केले. मात्र, आता भारताच्या एकतेवरच प्रहार केला जात आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ही एकट्यादुकट्या पक्षाची राहिलेली नाही. मोदी-शहा यांनी सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आम्ही कोणालाही पाठिंबा द्यायला तयार आहोत, असे केजरीवाल यांनी सांगितले.  तसेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत युती का होऊ शकली नाही, याचे कारणही त्यांनी स्पष्ट केले. युतीची चर्चा ही ट्विटरवर होऊ शकते का? जर मोदी-शहा पुन्हा सत्तेत आले तर त्यासाठी केवळ गांधीच जबाबदार असतील, असा इशाराही यावेळी केजरीवाल यांनी दिलाय.

 

मागे

वाराणसीत प्रियंका गांधी विरुध्द नरेंद्र मोदी या सामन्याला अखेर पूर्णविराम
वाराणसीत प्रियंका गांधी विरुध्द नरेंद्र मोदी या सामन्याला अखेर पूर्णविराम

उत्तर प्रदेशतील वाराणसीमधील लोकसभा मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी ....

अधिक वाचा

पुढे  

चौथ्या व अंतिम टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणातील ६४ उमेदवारांवर गंभीर गुन्हे
चौथ्या व अंतिम टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणातील ६४ उमेदवारांवर गंभीर गुन्हे

लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील चौथ्या व अंतिम टप्प्यात निवडणुकीच्या ....

Read more