ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बारामतीमध्ये अजित पवारांची भक्कम आघाडी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 24, 2019 01:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बारामतीमध्ये अजित पवारांची भक्कम आघाडी

शहर : मुंबई

पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती मतदारसंघात अजित पवार यांचेच वर्चस्व राहणार असल्याचे दिसून येत आहे. सध्या ते भाजपच्या गोपीचंद पडाळकर यांच्यापेक्षा ५० हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे बारामतीमध्ये अजित पवार यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

पवार कुटुंबीयांच्या बारामतीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपने वंचित बहुजन आघाडीतून आयात केलेल्या गोपीचंद पडाळकर यांना रिंगणात उतरवले होते. धनगर समाजाचे गोपीचंद पडाळकर अजितदादांपुढे कडवे आव्हान उभे करतील, अशी आशा भाजपला होती. मात्र, ही आशा सपशेल फोल ठरली आहे.

आज मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच अजित पवार यांनी आघाडी घेतली होती. ही आघाडी त्यांनी सातत्याने वाढवत नेली.  २०१४ मध्ये गोपीचंज पडळकर भाजपाच्या तिकीटावर सांगलीच्या खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढले होते. तर २०१९ लोकसभा निवडणूक वंचितकडून सांगलीमधून लढले होते. यावेळी पुन्हा त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना थेट बारामतीमधून उमेदवारी देऊ केली होती. मात्र, ते अजित पवार यांच्यासमोर आव्हान निर्माण करू शकले नाहीत.

१९६७ पासून पवार कुटुंबातील व्यक्तीनेच विधानसभेत बारामतीचे प्रतिनिधीत्व केले आहे. १९६७ ते १९९० शरद पवार आणि त्यानंतर अजित पवार सातत्याने या मतदारसंघातून निवडून येत आहेत. गेल्या ५० वर्षात बारामतीमध्ये कुठलाही पक्ष पवार कुटुंबासमोर आव्हान उभा करु शकलेला नाही.

मागे

रत्नागिरीतून शिवसेनेचे उदय सामंत, तर कणकवलीतून नितेश राणे विजयी
रत्नागिरीतून शिवसेनेचे उदय सामंत, तर कणकवलीतून नितेश राणे विजयी

कोकणात रत्नागिरीतून उदय सामंत यांनी तर सिंधुदुर्गातून नितेश राणे तर श्रीव....

अधिक वाचा

पुढे  

पश्चिम महाराष्ट्रात युतीला खिंडार, आघाडी 'पवार'फुल्ल?
पश्चिम महाराष्ट्रात युतीला खिंडार, आघाडी 'पवार'फुल्ल?

नगर जिल्ह्यातील 12 पैकी 8 जागांवर सध्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीवर आहे. तर ....

Read more