ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रत्नागिरीतून शिवसेनेचे उदय सामंत, तर कणकवलीतून नितेश राणे विजयी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 24, 2019 12:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रत्नागिरीतून शिवसेनेचे उदय सामंत, तर कणकवलीतून नितेश राणे विजयी

शहर : मुंबई

कोकणात रत्नागिरीतून उदय सामंत यांनी तर सिंधुदुर्गातून नितेश राणे तर श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनी विजय मिळवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेला चांगले यश मिळत असले तरी चिपळूणची जागा गमविण्याची भीती आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी शेखर निकम यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली आहे. त्यामुळे येथे शिवसेनेला जोरदार धक्का मानला जात आहे. मात्र, रत्नागिरीत निर्विवाद उदय सामंत यांनी आपला विजय साकारला आहे. त्यांच्यासमोर विरोधकांचे तितकेसे आव्हान नव्हते. उदय सामंत यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली आहे.

तर शिवसेनेने खेड-दापोली येथील जागा खेचून आणताना दिसून येत आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पूत्र योगेश कदम यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली. येथे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संजय कदम यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. तर राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले भास्कर जाधव यांना गुहागरमधून राष्ट्रवादीचे सहदेव बेटकर यांनी जोरदार टक्कर दिली आहे. या ठिकाणी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. जाधव यांना मोठी आघाडी घेता आलेली नाही. त्यामुळे येथे त्यांची दमछाक होताना दिसून येत आहे. दरम्यान, राजापूर येथेही कडवी लढत पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे राजन साळवी यांनी सुरुवातीला आघाडी घेतली होती. त्यानंतर भाजपचे 

तर सिंधुदुर्गात भाजपमध्ये दाखल झालेले आणि भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे नारायण राणे यांचे पूत्र नितेश राणे यांची विजयाकडे वाटचाल दिसून येत आहे. त्यांनी प्रथमपासून आघाडी घेतली होती. अकाव्या फेरीतही त्यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे ते एक पाऊल विजयापासून लांब आहेत.

 

मागे

पालघरचे शिवसेनेचे श्रीनिवास वनगा विजयी
पालघरचे शिवसेनेचे श्रीनिवास वनगा विजयी

विधानसभा निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. पालघर विधानसभेत शिवसेनेचा फग....

अधिक वाचा

पुढे  

बारामतीमध्ये अजित पवारांची भक्कम आघाडी
बारामतीमध्ये अजित पवारांची भक्कम आघाडी

पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती मतदारसंघात अजित पवार यांचे....

Read more