ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पाच वर्षांत काय केले म्हणत नागरिकांची धक्काबुक्की

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 20, 2019 06:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पाच वर्षांत काय केले म्हणत नागरिकांची धक्काबुक्की

शहर : मुंबई

प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्षांचे नेते आणि उमदेवार आश्वासनाचा पाऊस पाडत असतात. कधीतरी पहायला मिळते की एखादा उमेदवार दिलेले आश्वासन पाळतो. उत्तर प्रदेशमध्ये मात्र प्रचाराला आलेल्या भाजप उमेदवाराला नागरिकांनी मागील पाच वर्षांत केलेल्या कामाचा हिशोब मागितला. जनतेचा रोष पाहत या उमेदवाराला गावातून पळून यावे लागले.

युपीतील सलेमपूर लोकसभा मतदार संघातून २०१४ ला भाजपकडून निवडून आलेले खासदार रविंद्र कुशवाहा यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहेरविंद्र कुशवाहा हे आपल्या मतदारसंघात प्रचाराला गेले असताना त्यांना नागरिकांच्या रोषाला समोर जावे लागले. मागील पाच वर्षांत तुम्ही किती काम केले असा जाब नागरिकांनी विचारला. नागरिकाचा रोष लक्षात घेत कुशवाहा यांनी गाडीतून उतरताच परतावे लागले

कुशवाहा गावात येताच लोकांनी त्यांची गाडी अडवत जाब विचारायला सुरुवात केली. लोकांच्या प्रश्नाला उत्तर देत संतप्त खासदार महोदयांनी लोकांना शिव्या देत तुमचे मतदान नको असे सांगितले. कुशवाहा यांच्या संतप्त भूमिकेमुळे गावकऱ्यांनी त्यांना धक्काबुक्की केलीगावकऱ्यांचा संताप लक्षात घेत कुशवाहा आणि त्यांच्या सोबत असलेल्या स्थानिक आमदाराने लोकांना समजावण्यासाठी गाडीतून उतरत असतानाच लोकांनी त्यांना विरोध केला. कुशवाह यांना अक्षरश: गावातून पळवून लावण्यात आले. लोकांचा रोष वाढत असल्याचे लक्षात येताच खासदार रवींद्र कुशवाह यांनी गावातून काढता पाय घेतला.

मागे

मुंबईच्या वरळीतील बीडीडी चाळीतील रहिवाशांचा निवडणुकीवर बहिष्कार
मुंबईच्या वरळीतील बीडीडी चाळीतील रहिवाशांचा निवडणुकीवर बहिष्कार

मुंबईच्या वरळी भागातील बीडीडी चाळ क्रमांक ३९ आणि ४० इथल्या रहिवाशांनी निवड....

अधिक वाचा

पुढे  

साध्वीच्या उलट्या बोंबा, उद्धव ठाकरे यांनी मौन सोडले
साध्वीच्या उलट्या बोंबा, उद्धव ठाकरे यांनी मौन सोडले

मी माफी मागितली, माझा छळ करणारे माफी मागणार का? साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिन....

Read more