ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चेन्नईतील अर्वाकुरची इथल्या प्रचारादरम्यान महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर भाषण करताना कमल हासन या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 20, 2019 05:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चेन्नईतील अर्वाकुरची इथल्या प्रचारादरम्यान महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर भाषण करताना कमल हासन या

शहर : देश

मक्कल निधी मय्यमचे नेते कमल हासन यांना मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 'नथुराम गोडसे'वरील वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर हासन यांच्यावर टीका होत होती. 'नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता.' असे वादग्रस्त वक्तव्य कमल हासन यांनी केले होते.चेन्नईतील अर्वाकुरची इथल्या प्रचारादरम्यान महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर भाषण करताना कमल हासन यांनी नथुराम गोडसे हिंदू दहशतवादी असल्याचे विधान केले होते. त्यानंतर ते चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले. कमल हासन यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीकेची झोड उठवली होती. न्या. बी. पुगालेंधी यांच्या खंडपीठाने कमल हासन यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्याचप्रमाणे पुढील पंधरा दिवसात न्यायालयात हजर राहण्याचे आदेश कमल हासन यांना देण्यात आले आहेत. सुट्टयांच्या कालावधीत अशा याचिकांचा स्वीकार करता येणार नसल्याचे न्या. बी. पुगालेंधी यांनी सांगितले. त्यामूळे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करण्यास त्यांनी सूचवले होते. कमल हासन यांच्यावर भादंवि कलम १५३(ए),२९५(ए) या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मागे

चारा छावण्या आणि पीक कर्जासाठी काँग्रेसतर्फे रास्ता रोको, ६५ कार्यकर्ते ताब्यात
चारा छावण्या आणि पीक कर्जासाठी काँग्रेसतर्फे रास्ता रोको, ६५ कार्यकर्ते ताब्यात

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याबाबत....

अधिक वाचा

पुढे  

एक्झिट पोलनंतर विरोधकांमध्ये फूट? दिल्लीतील बैठकीला नेत्यांची दांडी
एक्झिट पोलनंतर विरोधकांमध्ये फूट? दिल्लीतील बैठकीला नेत्यांची दांडी

लोकसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) निकाल समोर आल्यानं....

Read more