ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चारा छावण्या आणि पीक कर्जासाठी काँग्रेसतर्फे रास्ता रोको, ६५ कार्यकर्ते ताब्यात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 20, 2019 05:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चारा छावण्या आणि पीक कर्जासाठी काँग्रेसतर्फे रास्ता रोको, ६५ कार्यकर्ते ताब्यात

शहर : मुंबई

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याबाबत विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून चारा छावण्या सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. परंतु प्रशासनाकडून अद्याप एकाही गावात चारा छावणी सुरू करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहेतुटपुंजे अनुदान, जाचक अटी शर्तींमुळे छावण्या चालवणे कठीण होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने जाचक अटी शिथिल करून तत्काळ जिल्ह्यात चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. या मागणीसाठी आज शेगाव शहरात काँग्रेसने रस्ता रोको आंदोलन केले.

काँग्रेसच्या मागण्या 

जिल्ह्यात प्रचंड दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पाण्याचा, चार्याचा आणि पशुधन वाचवण्याचा मोठा प्रश् शेतकर्यांना पडला आहे. राज्य सरकारने 25 जानेवारी रोजी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याचा अध्यादेश जारी केला मात्र अद्यापपर्यंत एकही छावणी सुरु झालेली नाही. ती तात्काळ सुरु व्हावी, पाणी टंचाई असलेल्या गावात टँकरने पाणी पुरवठा व्हावा आणि शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज वाटप करण्यात यावे अशा मागण्या काँग्रेसने ठेवल्या.

65 जण ताब्यात 

या मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाचे नेते रामविजय बुरुंगले यांच्या नेतृत्वात तालुका आणि शहर काँग्रेसच्या वतीने शेगाव शहरातील शिवाजी चौकात खामगाव -अकोट राज्यमार्गावर रस्ता रोको करण्यात आलेयाचा वाहतूकीवर परिणाम झाला. दरम्यान ठाणेदार सुनील हूड यांनी रास्तारोको करण्याऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी 65 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध कारवाई केली आहे.

 

मागे

१९९९ पासून अनेक एक्झिट पोल चुकीचे ठरत आले आहेत,उपराष्ट्रपतींचा सूचक इशारा
१९९९ पासून अनेक एक्झिट पोल चुकीचे ठरत आले आहेत,उपराष्ट्रपतींचा सूचक इशारा

लोकसभा निवडणुकीचे अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर काही वेळातच व....

अधिक वाचा