ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवसेनेच्या वचननाम्यातील १० प्रमुख वचनं...

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 12, 2019 01:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवसेनेच्या वचननाम्यातील १० प्रमुख वचनं...

शहर : मुंबई

शनिवारी सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेचा स्वतंत्र वचननामा प्रसिद्ध करण्यात आलाय. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात आधीच काही योजना जाहीर केल्या आहेत. या वचननाम्यात आणखी काही महत्त्वाच्या योजनांची माहिती दिली आहे. वचननाम्यावर बारकोडही प्रसिद्ध करण्यात आलाय. हा बारकोड स्कॅन केल्यावर तुमच्या मोबाईलवरही हा वचननामा तुम्हाला वाचता येऊ शकेल, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. उल्लेखनीय म्हणजे, यावेळी उद्धव ठाकरेंऐवजी आदित्य ठाकरे यांनी वचननाम्यावर निवेदन दिलं. या वचननाम्यात शिवसेनेनं १० प्रमुख वचनं जनतेला दिली आहेत.

प्रथमती

आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामुल्य करणार

युवा सरकार फेलो

राज्यातील १५ लाख पदवीधर युवांना शिष्यवृत्तीची संधी देणार

विद्यार्थी एक्स्प्रेस

तालुका स्तरावर गाव ते शाळा / महाविद्यालयामधील सर्व विद्यार्थ्यांसाठी ,५०० विशेष बसची सेवा सुरू करणार

शेतकऱ्यांचे हित

शेतीखालील क्षेत्रवाढीसाठी अल्पभूधारक आर्थिक दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रु. १०,००० प्रतीवर्षी जमा करणार

वीज दरकपात

३०० युनिट पर्यंत वीजवापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीज दर ३० टक्क्यांनी कमी करणार

मजबूत ग्रामीण रस्ते

राज्यातील सर्व खेड्यांतील रस्ते बारमाही टिकाऊ करण्याचे धोरण आखणार

एक रुपी क्लिनिक

रुपयात आरोग्य चाचणी सुविधा देण्यासाठी राज्यभरात रुपी क्लिनिक सुरु करणार.

सन्मान निराधारांचा

निराधार पेन्शन योजने अंतर्गत असणारे मानधन दुप्पट करणार

मागे

उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा  प्रसिद्ध
उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध

मुंबईत शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकर....

अधिक वाचा

पुढे  

शिवसेनेने वचननाम्यात 'आरे'चा उल्लेख टाळला
शिवसेनेने वचननाम्यात 'आरे'चा उल्लेख टाळला

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवसेनेकडू....

Read more