ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 12, 2019 01:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा  प्रसिद्ध

शहर : मुंबई

मुंबईत शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते मातोश्रीवर या वचननाम्याचं प्रकाशन झालं. वचननामा प्रसिद्ध होण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी विविध प्रचारसभांमध्येच आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. त्यामुळे आता वचननाम्यात मतदारांना खूश करण्यासाठी आणखी काय असणार याबाबत उत्सुकता लागली होती. यापूर्वीच काँग्रेस राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. तर भाजपचा जाहीरनामा १५ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे या जाहीरनाम्यांपेक्षा वेगळा आणि मतदारांना आकर्षित करणारा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे.विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध करताना आदित्य ठाकरे, अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी, मिलिंद नार्वेकर उपस्थिती होते. वचननमाम्यावर बारकोडही प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा बारकोड स्कॅन केल्यावर तुमच्या मोबाईलवरही हा वचननामा तुम्हाला वाचता येऊ शकेल, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.'भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला तर त्यातील चांगल्या योजनांचं नक्की स्वागत करु.' असं देखील या वेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

मागे

भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी युती धर्मावरून शिवसेनेला फटकारले
भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी युती धर्मावरून शिवसेनेला फटकारले

भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी युती धर्मा....

अधिक वाचा

पुढे  

शिवसेनेच्या वचननाम्यातील १० प्रमुख वचनं...
शिवसेनेच्या वचननाम्यातील १० प्रमुख वचनं...

शनिवारी सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेचा स्व....

Read more