ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

एकाच वेळी “चौकीदार” ५०० ठिकाणांवर पोहोचणार

By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 31, 2019 06:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एकाच वेळी  “चौकीदार” ५००  ठिकाणांवर पोहोचणार

शहर : देश

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'मैं भी चौकीदार' या मोहिमेअंतर्गत रविवारी पंतप्रधान मोदी एक कोटी जनतेशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. संध्याकाळी वाजता तालकटोरा मैदानात हा कार्यक्रम होणार आहे. देशातल्या ५०० ठिकाणांहून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान जनतेशी  संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील लोकांशी पंतप्रधान संवाद साधतील. यावेळी अमित शाह, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज दिल्लीत विविध ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तर योगी आदित्यनाथ आग्रा येथे हजर असतील.

 

याबद्दल ट्विटरवरून माहिती देताना नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, 'मैं भी चौकीदार' या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशाच्या विविध भागातील लाखो चौकीदार एकत्र जमणार आहेत. हा ऐतिहासिक असा क्षण असेल. नरेंद्र मोदी यांनी १६ मार्चपासून 'मैं भी चौकीदार' या मोहीमेची सुरुवात केली होती. या मोहिमेतंर्गत नरेंद्र मोदी आणि भाजपच्या मंत्र्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरील नावाच्या आधी चौकीदार हे संबोधन लावले होते. या मोहीमेची देशभरात चांगलीच चर्चा झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून भाजपकडून आक्रमक प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, या प्रचाराला हवी तशी धार येत नव्हती. काँग्रेसची 'चौकीदार चोर है' ही घोषणा भाजपसाठी डोकेदुखी ठरत होती. तेव्हा मोदींनी 'मै भी चौकीदार हूं' असा नारा देत काँग्रेसला शह दिल्याचे मानले जाते. सोशल मीडियावर या मोहिमेला चांगलेच यश मिळाले.

मागे

उर्मिला मातोंडकरला निवडणुकीत आता मनसेची साथ हवी आहे
उर्मिला मातोंडकरला निवडणुकीत आता मनसेची साथ हवी आहे

अभिनेञी उर्मिला मातोंडकरला निवडणुकीत आता मनसेची साथ हवी आहे. उर्मिला मात....

अधिक वाचा

पुढे  

पंतप्रधान मोदींची राज्यातली पहिली सभा आज वर्ध्यात
पंतप्रधान मोदींची राज्यातली पहिली सभा आज वर्ध्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज वर्ध्यामध्ये सभा होत आहे. स्वावलंबी शाळेच्....

Read more