ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बच्चू कडू यांचा राज्य सरकारला घरचा आहेर; म्हणाले...

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 23, 2020 11:14 AM 2019-02-12T14:15:30+5:30

बच्चू कडू यांचा राज्य सरकारला घरचा आहेर; म्हणाले...

शहर : अमरावती

राज्यातील शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या समस्यांच्या मुद्द्यावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकासआघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. राज्यातील कृषी खाते झोपले की काय अशी स्थिती निर्माण झाली झाल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले. ते शनिवारी चांदूर बाजार तालुक्यातील शेतीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी कृषी खात्याला खडे बोल सुनावले.

काही दिवसांपूर्वीच बोगस बियाणांमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. यामधून शेतकरी सावरत नाही तोच अमरावतीच्या चांदुर बाजार तालुक्यातील अनेक भागात सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. मात्र, सरकार किंवा कृषी खात्याकडून त्यांची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. ही परिस्थिती पाहून बच्चू कडू यांनी कृषी खात्याला धारेवर धरले. राज्यातील कृषी खाते झोपले की काय अशी स्थिती निर्माण झाल्याचे बच्चू कडू म्हणाले. त्यामुळे आता कृषी खात्याकडून या समस्या दूर करण्यासाठी पावले उचलली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांनी किसान रेल्वे सुरु केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले होते. किसान रेल ही चांगली संकल्पना आहे. त्यामुळे अगदी  ९०% नाही पण किमान १०% तरी फायदा हा शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे मी केंद्र सरकारचे आभार मानतो. यासोबतच मराठवाडा, विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र ,आणि कोकण या भागांतूनही एक एक किसान रेल्वे सरकारने सुरू करावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. जर प्रत्येक भागातून अशी रेल्वे सुरू झाली तर शेतकऱ्यांना देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध होईल, असे बच्चू कडू यांनी म्हटले होते.

 

मागे

शिर्डीचे साई मंदिरही खुले करावे अन्यथा न्यायालयात‌ जाऊ
शिर्डीचे साई मंदिरही खुले करावे अन्यथा न्यायालयात‌ जाऊ

माजीमंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र खासद....

अधिक वाचा

पुढे  

२३ नेत्यांच्या लेटर बॉम्बनंतर काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी, सोनिया गांधी राजीनाम्याच्या तयारीत
२३ नेत्यांच्या लेटर बॉम्बनंतर काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी, सोनिया गांधी राजीनाम्याच्या तयारीत

काँग्रेस पक्षात नेतृत्वावरून सुरू असलेल्या घडामोडींमध्येच आता सोनिया गां....

Read more