ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बाळासाहेब थोरांतांची काँग्रेस गटनेतेपदी निवड

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 26, 2019 01:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बाळासाहेब थोरांतांची काँग्रेस गटनेतेपदी निवड

शहर : मुंबई

महाराष्ट्रामध्ये बहुमत चाचणीला १ दिवस बाकी असताना अखेर काँग्रेसने त्यांच्या गटनेत्याची निवड केली आहे. काँग्रेसचे गटनेते म्हणून एकमताने बाळासाहेब थोरात यांची निवड झाली. थोरात काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात. सोनिया गांधींनी काँग्रेस पक्षाचा गटनेता म्हणून बाळासाहेब थोरांतांची निवड केली.

काही दिवसांपूर्वी आमदारांची सोनिया गांधींसोबत बैठक झाली होती. त्या बैठकीत सोनिया गांधींनी बाळासाहेब थोरांतांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं. आज त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलानुसार जर काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला तर बाळासाहेब थोरातांचा मुख्यमंत्रिपदासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. उद्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसंच बहुमत चाचणी गुप्त मतदान नाही तर लाईव्ह टेलिकास्ट करा, असंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

उद्या सकाळी ११ वाजता आमदारांच्या शपथविधीचा कार्यक्रम सुरु होईल आणि ५ वाजता हा कार्यक्रम संपेल. ५ वाजता हंगामी अध्यक्ष बहुमत चाचणी घेईल. ही चाचणी गुप्त मतदानाने होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निरिक्षणात ही चाचणी होणार आहे, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. तर फडणवीस यांच्याबरोबर अजित पवार यांनीही राजीनामा द्यावा, असं शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.

 

मागे

राज्यघटनेतील तत्वे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक - शरद पवार
राज्यघटनेतील तत्वे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक - शरद पवार

महाराष्ट्रामधील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. न्यायालयाने मह....

अधिक वाचा

पुढे  

आम्ही बहुमत सिद्ध करुन दाखवू, चंद्रकांत पाटलांना विश्वास, भाजपचं संख्याबळ किती?
आम्ही बहुमत सिद्ध करुन दाखवू, चंद्रकांत पाटलांना विश्वास, भाजपचं संख्याबळ किती?

“सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे त्या निकालाचा आम्ही आदर करतो. उद्या वि....

Read more