ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आम्ही बहुमत सिद्ध करुन दाखवू, चंद्रकांत पाटलांना विश्वास, भाजपचं संख्याबळ किती?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 26, 2019 02:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आम्ही बहुमत सिद्ध करुन दाखवू, चंद्रकांत पाटलांना विश्वास, भाजपचं संख्याबळ किती?

शहर : मुंबई

सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे त्या निकालाचा आम्ही आदर करतो. उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आम्ही तयार आहोत, आम्ही बहुमत सिद्ध करुन दाखवू, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजप नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधून बहुमत सिद्ध करणारच असा विश्वास व्यक्त केला.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वाचा निकाल दिला. कोर्टाने उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस सरकारला दिला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांना उद्या म्हणजे 27 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने फडणवीसांना 30 तासांची मुदत दिली आहे. ही बहुमत चाचणी खुल्या पद्धतीने होईल म्हणजेच गुप्त होणार नाही, त्याचं लाईव्ह चित्रीकरण करा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. बहुमत चाचणीसाठी हंगामी अध्यक्षांची (प्रोटेम स्पीकर) नियुक्ती करा, असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले.

भाजपचं संख्याबळ किती?

विधानसभेत 145 हा बहुमताचा आकडा आहे. भाजपला 6 अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षांच्या 7 आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपचं संख्याबळ 118 वर गेलं आहे.

अजित पवारांचा पाठिंबा

अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक आमदार आहेत असा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे आम्ही 170 पर्यंत पोहोचू असं भाजपकडून वारंवार सांगण्यात येत आहे.

भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार-

महेश बालदीउरण (रायगड)

विनोद अग्रवालगोंदिया (गोंदिया)

गीता जैनमीरा भाईंदर (ठाणे) – (भाजप बंडखोर)

किशोर जोरगेवारचंद्रपूर (चंद्रपूर)

रवी राणाबडनेरा (अमरावती)

राजेंद्र राऊतबार्शी (सोलापूर)

प्रकाश आवाडेइचलकरंजी (कोल्हापूर) (काँग्रेस बंडखोर)

संजय मामा शिंदेकरमाळा (सोलापूर) (राष्ट्रवादी बंडखोर)

श्यामसुंदर शिंदे – <पक्षशेकाप> लोहा (नांदेड) – (भाजप बंडखोर)

रत्नाकर गुट्टे – <पक्षरासप> – गंगाखेड (परभणी)

विनय कोरे – <पक्षजनसुराज्य पक्ष> – शाहूवाडी (कोल्हापूर)

भाजप संख्याबळ – 105 +11 + अजित पवार (3) = 119

शिवसेनेला पाठिंबा दिलेले आमदार

आशिष जयस्वालरामटेक (नागपूर)

नरेंद्र भोंडेकरभंडारा (भंडारा)

चंद्रकांत पाटीलमुक्ताईनगर (जळगाव) – (शिवसेना बंडखोर)

मंजुषा गावितसाक्री, धुळे (भाजप बंडखोर)

राजेंद्र पाटील यड्रावकरशिरोळ, कोल्हापूर (राष्ट्रवादी बंडखोर)

बच्चू कडू – <पक्षप्रहार संघटना> – अचलपूर (अमरावती)

राजकुमार पटेल – <पक्षप्रहार संघटना> – मेळघाट (अमरावती)

शंकरराव गडाख – <पक्षक्रांतिकारी शेतकरी पक्ष> – नेवासा (अहमदनगर)

शिवसेना संख्याबळ 56 + 8 = 64

राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ – 54

काँग्रेस – 44

शिवसेना 64 + राष्ट्रवादी 54+काँग्रेस 44 = 162

आम्ही 162 – महाविकासआघाडीचा दावा

दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकासआघाडीने आपल्याकडे 162 आमदारांचं संख्याबळ असल्याचा दावा केला आहे. तसं पत्र महाविकासआघाडीने राज्यपालांना दिलं आहे. सर्व आमदारांच्या त्यावर सह्या आहेत.

यांचा पाठिंबा कोणाला?

मनसे – 01

माकप – 01

एमआयएम – 02

कोणालाही बहुमत नाही

विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 पैकी 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या, राष्ट्रवादी 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 जागांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे सत्ता स्थापन्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे.

आताचं संख्याबळ

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेना 56

शिवसेना समर्थक 07

राष्ट्रवादी 51

काँग्रेस 44

स्वाभिमानी 01

मार्क्सवादी 01

सपा 02

एकूण 162

 

भाजप युती

भाजप 105

भाजप समर्थक 011

अजित पवार समर्थक – 003

एकूण 119

कुंपणावर

एमआयएम 2

एमएनएस 1

बविआ 3

अपक्ष 1

एकूण 7

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 पक्षीय बलाबल

भाजप – 105

शिवसेना – 56

राष्ट्रवादी – 54

काँग्रेस – 44

बहुजन विकास आघाडी – 03 (महाआघाडी)

प्रहार जनशक्ती – 02 (शिवसेनेला पाठिंबा)

एमआयएम – 02

समाजवादी पक्ष – 02 (महाआघाडी)

मनसे – 01

माकप – 01

जनसुराज्य शक्ती – 01 (भाजपला पाठिंबा)

क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01 (शिवसेनेला पाठिंबा)

शेकाप – 01 (भाजपला पाठिंबा)

रासप – 01 (भाजपला पाठिंबा)

स्वाभिमानी – 01 (महाआघाडी)

अपक्ष – 13

एकूण – 288

मागे

बाळासाहेब थोरांतांची काँग्रेस गटनेतेपदी निवड
बाळासाहेब थोरांतांची काँग्रेस गटनेतेपदी निवड

महाराष्ट्रामध्ये बहुमत चाचणीला १ दिवस बाकी असताना अखेर काँग्रेसने त्यांच....

अधिक वाचा

पुढे  

हंगामी विधानसभा अध्यक्षांना इतकं महत्त्व का?
हंगामी विधानसभा अध्यक्षांना इतकं महत्त्व का?

महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा (26 नोव्हेंबर) अत्यंत महत्त्वाचा ठरला. सर्वो....

Read more