ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ऐंशी वर्षांचा पैलवान मुख्यमंत्री ठरवतो, बारामतीत पोस्टरमधून फडणवीसांवर टीकास्त्र

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 29, 2019 11:44 AM 2019-02-12T14:15:30+5:30

ऐंशी वर्षांचा पैलवान मुख्यमंत्री ठरवतो, बारामतीत पोस्टरमधून फडणवीसांवर टीकास्त्र

शहर : मुंबई

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले होते. या पार्श्वभूमीवर बारामती शहरात पोस्टरमधून फडणवीसांवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. ‘जेवढं राज्य करायचं होतं, तेवढं केलं आता राज्य करायची बारी आमची…’ असं फलकावर लिहिलं आहे.गेला महिनाभर सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर अखेर तोडगा निघाला आणि या नाट्यमय घडामोडींनंतर आता शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी महाविकासआघाडीने सत्ता स्थापन केली आहे. महाविकास आघाडी स्थापन करण्यात शरद पवारांचा मोठा हात असल्यामुळे बारामतीकरांना हुरुप आला आहे.

जेवढं राज्य करायचं होतं, तेवढं केलं आता राज्य करायची बारी आमची महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा ऐंशी वर्षाचा पैलवान ठरवेल, तोच होणार, कारण कोणी कितीही उड्या मारल्या तरी सगळी सूत्रं इथूनच हलतात साहेब…’ असे फलक उभारुन देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी धक्कातंत्राचा वापर करत अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अवघ्या काही तासातच अजित पवारांनी आपला निर्णय मागे घेऊन राजीनामा दिला. अजित पवार यांच्या या निर्णयामुळे बारामतीकरांमध्ये द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती. अनेक बारामतीकर अजित पवारांच्या निर्णयाचे स्वागत करत होते, तर काही अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त करत होते. अखेर आज या सर्व घडामोडींना पूर्णविराम मिळाला.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शरद पवारांनी चंग बांधला होता. महाराष्ट्र पिंजून काढत भर पावसात सभा घेऊन भाजपविरोधी वातावरण निर्मिती केली गेली. मात्र आघाडीला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्याच वेळी मुख्यमंत्रिपदावरुन भाजप-शिवसेनेत बिनसले आणि युती तुटली. पवारांनी शिवसेनेशी जुळतं घेऊन शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय अंमलात आला.

विरोधी बाकावर बसण्याचा कौल मिळालेला राष्ट्रवादी-काँग्रेस पक्ष आज सत्तेत आल्याने बारामतीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांनी फटाके वाजून आनंद साजरा केला. या आनंद उत्सवाबरोबरच फलकाची बारामतीत जोरदार चर्चा सुरु आहे.

 

मागे

आता गोव्यात राजकीय भूकंप घडेल - संजय राऊत
आता गोव्यात राजकीय भूकंप घडेल - संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद खेचून आणल्यान....

अधिक वाचा

पुढे  

काँग्रेस उपमुख्यमंत्रीपदासाठी आग्रही,राष्ट्रवादी काय घेणार निर्णय?
काँग्रेस उपमुख्यमंत्रीपदासाठी आग्रही,राष्ट्रवादी काय घेणार निर्णय?

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारमध्ये पहिल्....

Read more