ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आमदार गणपतराव देशमूख यांचे उत्तराधिकारी भाऊसाहेब रूपकर

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2019 03:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आमदार गणपतराव देशमूख यांचे उत्तराधिकारी भाऊसाहेब रूपकर

शहर : सोलापूर

शेतकरी कागार पक्षाचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांचे उत्तराधिकारी म्हणून फब टेक उद्योगाचे प्रमुख भाऊसाहेब रूपकर यांच्या नावाची घोषणा शेकापचे जयंत पाटील यांनी केली. शेकापचा सांगोला विधानसभा मतदार संघातील उमेदवार म्हणून  गणपतराव देशमुखांचे चिरंजीव चंद्रकांत देशमुख यांच्या नावाची चर्चा असताना रूपकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

गणपतराव देशमुख यांचे वय 94 वर्ष आहे. त्यामुळे यापुढे आपण निवडणूक लढविणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. सांगोला या दुष्काळी मतदारसंघातून  ते 11 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. 1972 मध्ये काकासाहेब साळुंखे पाटील यांनी आणि 1995 च्या निवडणुकीत कॉंग्रेस चे शहाजी बापू पाटील यांनी गणपतराव देशमुख यांचा पराभव केला होता. हे दोन अपवाद वगळता 1962 पासून ते या मतदार संघातून जिंकतच आले आहेत

संपूर्ण देशात तसेच राज्यात सर्वत्र पक्षात घराणे शाही बोकाळली असताना तब्बल 11 वेळा एकाच पक्ष एकाच मतदार संघातून निवडून आलेले शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांनी मनात आणले असते तर सांगोला  मतदार संघातून आपल पुत्र चंद्रकांत देशमुख यांना सहज उमेदवार म्हणून जाहीर करू शकले असते पण त्यांनी आपली राजकीय तत्वनिष्ठा सांभाळत निष्ठावंत कार्यकर्त्यास संधि देवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

मागे

नमिता मुंदडा भाजपावासी
नमिता मुंदडा भाजपावासी

शरद पवार यांच्या इडीच्या नाटयांनतर आणि अजित पवार यांच्या राजीनामा नंतर पुन....

अधिक वाचा

पुढे  

मनसेचे 2 उमेदवार जाहीर
मनसेचे 2 उमेदवार जाहीर

महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडनूकीसा....

Read more