ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

देशात भाजपला उतरती कळा लागली आहे - शरद पवार

By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 05, 2019 11:13 AM 2019-02-12T14:15:30+5:30

देशात भाजपला उतरती कळा लागली आहे - शरद पवार

शहर : मुंबई

देशात भाजपला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे पुन्हा देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्ता येणार नाही. लोकसभा निवडणुकीआधी देशात तीन राज्यांत सत्ता परिवर्तन झाले आहे. हे कशाचे धोतक आहे? तेथे काँग्रेसचे अस्तित्वच नव्हते. तेथे काँग्रेस सत्तेत आले, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे भाष्य केले आहे. मोदींबाबत जनमाणसात चांगली प्रतिमा तयार केली गेली. भाजपची टीम त्यासाठी कामाला लागली होती. नरेंद्र मोदी म्हणजे विकास. गुजरातमध्ये मोदींने विकासाचे मॉडेल बनविले आणि जनमाणसामध्ये हे विकासाचे मॉडेल बिंबविण्याचा प्रयत्न केला गेला. तसा प्रचार केला गेला. धर्म, जातीचा विचार न करता विकास, विकास असे बिंबविण्यात भाजप आणि एनडीए यशस्वी झाले. त्यामुळे लोकांना वाटले मोदी म्हणजे विकास. विकास होणार याच जोरावर ते सत्तेत बसले. जनतेने काँग्रेस ऐवजी मोदींना संधी दिली. मात्र, त्यांनी काय विकास केला? लोकांना खोटी आश्वासने दिली. त्यामुळे तीन राज्यांत भाजपची हार झाली. हीच परिस्थिती लोकसभा निवडणुकीत दिसून येईल आणि भाजपला फारसे यश मिळणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

मागे

लोकसभा निवडणूक २०१९ : मुंबई मतदारसंघातील थेट लढती
लोकसभा निवडणूक २०१९ : मुंबई मतदारसंघातील थेट लढती

मुंबई उत्तर या निवडणुकीत मुंबई उत्तर मतदारसंघातून भाजपने गोपाळ शेट्टी या....

अधिक वाचा

पुढे  

आप महाराष्ट्रातून लोकसभेची निवडणूक लढवणार नाही
आप महाराष्ट्रातून लोकसभेची निवडणूक लढवणार नाही

महाराष्ट्रातून ‘आप’ लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, असे या पक्षाचे प्रद....

Read more