ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आप महाराष्ट्रातून लोकसभेची निवडणूक लढवणार नाही

By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 05, 2019 11:42 AM 2019-02-12T14:15:30+5:30

आप महाराष्ट्रातून लोकसभेची निवडणूक लढवणार नाही

शहर : मुंबई

महाराष्ट्रातून आपलोकसभेची निवडणूक लढविणार नाही, असे या पक्षाचे प्रदेश निमंत्रक सुधीर सावंत यांनी सांगितले. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला रोखण्याची गरज आहे. हे लोक राज्यघटना मोडीत काढून हुकूमशाही आणतील, असा इशारा सावंत यांनी दिला असून या निवडणुकीत फॅसिस्ट शक्तीचा पराभव हे राष्ट्रीय हित असले पाहिजे, असे सावंत यांनी नमूद केले आहे. देशाच्या व्यापक हितासाठी मोदी-शहा या जोडीला पराभूत करा, असे आवाहन आपचे राष्ट्रीय निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेले आहे याकडे सावंत यांनी लक्ष वेधले.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आपने महाराष्ट्रातून ४८ उमेदवार उभे केले, पण यापैकी एकही उमेदवार विजयी झाला नाही. आपची ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती. गेल्या पाच वर्षांच्या काळात आपच्या लोकप्रियतेचा आलेख राज्यात तळाला गेलेला आहे. यामुळे जेथे शक्ती आहे तेथेच लक्ष केंद्रित करणार आहे. आप या लोकसभा निवडणुकीत देशात काही जागांवर लक्ष देणार असल्याचे स्पष्ट दिसते आहे.

मागे

देशात भाजपला उतरती कळा लागली आहे - शरद पवार
देशात भाजपला उतरती कळा लागली आहे - शरद पवार

देशात भाजपला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे पुन्हा देशात पंतप्रधान नरेंद्र ....

अधिक वाचा

पुढे  

राज ठाकरे राजू शेट्टींसाठी कोल्हापूरच्या मैदानात उतरणार
राज ठाकरे राजू शेट्टींसाठी कोल्हापूरच्या मैदानात उतरणार

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या 9 ते 10 उमेदवारांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ....

Read more