ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महापौरांविरोधात सोमय्यांची पोलिसांत तक्रार

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 29, 2020 05:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महापौरांविरोधात सोमय्यांची पोलिसांत तक्रार

शहर : मुंबई

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी निर्मल नगर पोलीस स्टेशन इथे तक्रार केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हाडा च्या जमिनीवर अनधिकृत वांद्रे पूर्व इथे त्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी बांधकाम केल्याचा सोमय्या यांचा आरोप आहे.कागदपत्रांसह सोमय्या यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

गरिबांची एसआरएमधील हक्काची घर महापौर आणि त्यांच्या कुटूंबियांनी हडपली असल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी हे सहन केल नसतं. ठाकरे सरकारकडून न्याय मिळणार नाही त्यामुळे आम्ही आज राज्यपालांना भेटणार आहोत. तसेच याविषयी न्यायालयात जाणार असल्याचेही सोमय्या यांनी म्हटलंय.

फेसबुक, व्हॉट्सएपवरून शिवसेनेचे कार्यकर्ते मला धमकावत असल्याचे देखील सोमय्या म्हणाले.

मी कुठलंही चुकीचे काम केलेले नाही हे हजार टक्के खरं असल्याची प्रतिक्रिया महापौरांनी देत किरीट सोमय्या यांचे आरोप फेटाळले आहेत. मी चांगलं काम करत आहे. ते काही लोकांना बघवत नाही. कही पे निगाए,कही पे निशाणा अशी अवस्था सोमय्यांची असल्याचे महापौर म्हणाल्या. मी कुठेही गाळे हडपले नाहीत. हडपले असतील तर माझ्या नावासह पुरावे द्यावेत असे महापौर किशोरी पेडणे  जे कागद दाखवले जातायत त्यात आमचे कुठेही नाव नाही, त्याचे पेपर दाखवा असे आव्हान त्यांनी दिलंय.

मी तिथं भाड्याने राहत होते. डिसेंबरपासून ते घरही सोडलेले आहे. किश कार्पोरेशनचे पत्ते किंवा सह्यांचे अधिकार यात पेडणेकर नाव असल्याचे तसंच एसआरएमध्ये आठ गाळे आहेत ते म्हणतायत. ते त्यांनी सिद्ध करावे असेही महापौर म्हणाल्या. दरवेळा प्रत्येक व्यक्तीच्या नावाने धिंगाणे घालायचं पण त्याचे पुढं काय होतं हे कुणालाच माहिती नसते. महापौरांना बदनाम करण्याचा त्यांचा हा डाव उधळला जाणार हे नक्की असेही त्या म्हणाल्या.

मागे

दोन पक्षांचे बडे नेते राजकारणावरच चर्चा करणार ना, चहा-बिस्किटावर नाही : चंद्रकांत पाटील
दोन पक्षांचे बडे नेते राजकारणावरच चर्चा करणार ना, चहा-बिस्किटावर नाही : चंद्रकांत पाटील

दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे दोन बडे नेते भेटतात, तेव्हा राजकारणावर चर्च....

अधिक वाचा

पुढे  

शरद पवारांचं दोन्ही छत्रपतींना आवाहन, म्हणाले 'केंद्र सरकारकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा'
शरद पवारांचं दोन्ही छत्रपतींना आवाहन, म्हणाले 'केंद्र सरकारकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा'

सध्या राज्यभरात मराठा आरक्षणावरुन आंदोलनं सुरु आहेत. या आंदोलनाचं नेतृत्व ....

Read more