ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दोन पक्षांचे बडे नेते राजकारणावरच चर्चा करणार ना, चहा-बिस्किटावर नाही : चंद्रकांत पाटील

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 29, 2020 12:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दोन पक्षांचे बडे नेते राजकारणावरच चर्चा करणार ना, चहा-बिस्किटावर नाही : चंद्रकांत पाटील

शहर : मुंबई

दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे दोन बडे नेते भेटतात, तेव्हा राजकारणावर चर्चा होणे साहजिकच आहे, असं सूचक वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीविषयी केलं. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला उत्तर देतानाराजकारणावर चर्चा करणे गुन्हा आहे का?’ असा प्रतिप्रश्न संजय राऊत यांनी विचारला.

दोन वेगवेगळ्या पक्षांचे बडे नेते भेटतात, तेव्हा राजकारणावर चर्चा होतेच. ते दोन-अडीच तास एकत्र असतील, तर चहा-बिस्किटावर तर चर्चा झाली नसणार ना. पण ही बैठक अनिर्णायक होती, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

निवडणूक लढवणे कोणत्याही पक्षासाठी, उमेदवारासाठी कठीण असतं. कुठल्याही पक्षाला मध्यावधी निवडणुका नको असतात. कोणाचीच कॉम्बिनेशन जुळली नाहीत, तडजोड झाली नाही तर मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. पण आगामी काळात निवडणूक भाजप सगळ्याच निवडणुका स्वबळावर लढवेल.” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

शिवसेनेला भूमिकाच नसते. त्यांना फक्त कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला खुश करण्यासाठी भूमिका असते. शिवसेनेकडे फक्त एकच भूमिका आहे, ती म्हणजे खुर्चीची असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी लगावला.

पक्षाचे प्रदेश प्रमुख म्हणून मी हे स्पष्ट करु इच्छितो की शिवसेना, राष्ट्रवादी किंवा कॉंग्रेसला सरकार स्थापण्याचा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. आम्ही सक्रिय विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहोत. त्यामुळे आम्ही तिघांसोबत सरकार बनवू शकत नाही, पण ते तिघे एकत्र राहू शकत नाहीत असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

मध्यावधी निवडणुका घ्यायच्या असतील, तर राजभवनमध्ये जाऊन सांगावे लागेल असे उत्तर संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर दिले. “राजकीय विषयावर बातचित करणे गुन्हा आहे का? दोन राजकीय नेते भेटले की देशावर चर्चा होते, कृषी विधेयकावर होते, जम्मू काश्मीरवर गप्पा रंगतात, चीनच्या विषयावर बातचित होते असे राऊत म्हणाले.

 

मागे

संजय राऊत यांच्यासोबतच्या भेटीवर फडणवीस म्हणतात..
संजय राऊत यांच्यासोबतच्या भेटीवर फडणवीस म्हणतात..

शिवसेना नेते संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यां....

अधिक वाचा

पुढे  

महापौरांविरोधात सोमय्यांची पोलिसांत तक्रार
महापौरांविरोधात सोमय्यांची पोलिसांत तक्रार

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात भाजपा नेते किरीट सोमय्या ....

Read more