ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अटल जल योजनेसाठी केंद्र सरकारची ६००० कोटी रुपयांना मंजुरी

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 24, 2019 05:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अटल जल योजनेसाठी केंद्र सरकारची ६००० कोटी रुपयांना मंजुरी

शहर : delhi

            नवी दिल्ली - शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावे यासाठी केंद्र सरकारने पावले उचलायला सुरुवात केली आहे. गावागावात पाणी पोहोचवण्यात यावे यासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारने दोन महत्त्वपूर्ण घोषणा करण्याचे ठरवले आहे. यासाठी केंद्र सरकारने आज ६००० कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली आहे.

            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आज दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हे दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अटल जल योजनेला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. या योजनेचा लाभ ६ राज्यांना होणार आहे. देशातील मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र आणि राजस्थान या सहा राज्यांचा यात समावेश आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या सहा राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी झाल्यास सहा राज्यांतील एकूण ८ हजार ३५० गावांना थेट फायदा पोहोचणार आहे.

         अटल जल योजनेला मंजुरी मिळाल्याने गावातील पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. यासाठी केंद्र सरकारकडून ६००० कोटी रूपयांचा फंड बनवण्यात आला आहे. यात ३००० हजार कोटी रुपये केंद्र सरकारचे असणार असून ३००० कोटी रुपये जागतिक बँक देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून पहिल्या टप्प्यात सहा राज्यात ही योजना लूागू करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत ८ हजार ३५० गावांत पाणी पोहोचवले जाणार असून नागरिकांची पाण्यासंबंधी जनजागृती केली जाणार आहे.

मागे

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा : मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा : मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्....

अधिक वाचा

पुढे  

अमृता फडणवीसांचा शिवसेनेवर पुन्हा पलटवार
अमृता फडणवीसांचा शिवसेनेवर पुन्हा पलटवार

            मुंबई - अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या....

Read more