ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाविकास आघाडीचे तात्पुरते मंत्रिमंडळ स्थापन करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 12, 2019 05:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महाविकास आघाडीचे तात्पुरते मंत्रिमंडळ स्थापन करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

शहर : मुंबई

         मुंबई – महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊन पंधरा दिवस उलटले. अजूनही महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ स्थापन झालेले नाही. हिवाळी अधिवेशनासाठी सहा मंत्र्यांमध्ये खातेवाटप होणार असून प्रत्येक मंत्र्याकडे चार खाती सोपवली जाणार आहेत. तर उर्वरित खात्यांचा भार मुख्यमंत्र्यांकडे असेल. 


        नागपूर अधिवेशन तोंडावर आलं आहे तरी अद्याप नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे अधिवेशना दरम्यान विरोधी पक्षाच्या आणि राज्याच्या जनतेच्या प्रश्नांवर उत्तर कोण देणार? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून राजभवनला खातेवाटपासाठी राज्यपालांकडे यादी सुपूर्त करण्यात आली आहे. आज राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर अधिसूचना निघणार आहे. नागपूर अधिवेशन तोंडावर आल्याकारणाने सामोरे जाण्यासाठी सहा मंत्र्यांमध्येच खाते वाटप होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.    


       आधी ठरलेल्या फॉर्म्युलानुसार, शिवसेनेला 15 मंत्रिपद, राष्ट्रवादी कॉंग्रेसला 15 मंत्रिपद आणि कॉंग्रेसला 12 मंत्रिपद मिळणार होती. यामध्ये शिवसेनेला 15 मंत्री अधिक मुख्यमंत्री म्हणजे 16 एकूण मंत्रिपद होती. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात मंत्रीपदाबाबत रस्सीखेच सुरू असल्यामुळे खातेवाटपला मुहूर्त मिळत नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यावर पुढील 7-8 दिवसांत तोडगा निघाला नाही तर मंत्रिमंडळात विस्तार लांबेल. 
 

मागे

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

       केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा विधेयक दोन्ही सभागृहात बहुमता....

अधिक वाचा

पुढे  

अयोध्या निर्णयावरील १८ पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने  फेटाळल्या
अयोध्या निर्णयावरील १८ पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

             नवी दिल्ली - अयोध्या प्रकरणी देण्यात आलेल्या निर्णयाचा फ....

Read more