ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का, आदित्य ठाकरेंच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्याला अटक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 18, 2024 09:36 AM 2019-02-12T14:15:30+5:30

ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का, आदित्य ठाकरेंच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्याला अटक

शहर : मुंबई

ठाकरे गटाला सर्वात मोठा झटका बसणारी बातमी समोर आली आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे अतिशय विश्वासू मानले जाणारे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना ईडीने अटक केली आहे. कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी सुरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

बीएमसी कथित खिचडी कोविड घोटाळ्याप्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले सुरज चव्हाण यांना ईडीने अटक केली आहे. सुरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे अतिशय जवळचे सहकारी मानले जातात. ठाकरे गटाच्या कालच्या महापत्रकार परिषदेलादेखील सुरज चव्हाण उपस्थित होते. ते आदित्य ठाकरे यांच्यासोबतच असतात. पण ईडीने त्यांना आज कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. सुरज चव्हाण यांची याप्रकरणी याआधी चौकशी देखील झाली आहे. त्यानंतर त्यांना आज अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेमुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे.

सुरज चव्हाण यांची गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चौकशी केली जात होती. खिचडी घोटाळ्याप्रकरणी आधी मुंबई पोलिसांनी त्यांची चौकशी केली होती. नंतर ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. ईडीनेसुद्धा त्यांची चौकशी केली होती. ईडीकडून अनेक तास ईडी कार्यालयात बसवून त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी आधी मुंबई पोलिसांत सुरज चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणी आता ईडीने त्यांना अटक केल्याची मोठी बातमी समोर आली आहे.

कोर्टात उद्या हजर केलं जाणार आणि

सुरज चव्हाण यांना उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यांना ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टात हजर केलं जाणार आहे. यावेळी कोर्टात ईडीकडून सुरज चव्हाण यांची ईडी कोठडीची मागणी केली जाणार आहे. ईडीच्या वकिलांकडून कोर्टात काय-काय मुद्दे मांडले जातात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

‘उद्धव ठाकरेंना घोटाळ्याचा हिशोब द्यावा लागणार, सोमय्यांची टीका

सुरज चव्हाण यांना अटक झाल्याची बातमी समोर आल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “कोविड लॉकडाऊन खिचडी घोटाळ्यात ईडीने आदित्य ठाकरे यांचे फ्रंटमेन सुरज चव्हाण यांना अटक केली आहे. ईडीच्या या कारवाईचं मी स्वागत करत आहे. खासदार संजय राऊत मित्र परिवाराच्या खात्यातही खिचडीचे पैसे गेले. उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या नेत्यांनी ऑक्सिजन खालं, रेमडेसिवीर, खिचडी खाल्ली, उद्धव ठाकरे साहेबांना सगळ्या कोविड घोटाळ्यांचा हिशोब द्यावाच लागणार, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

सत्याचा विजय, अमेय घोले यांचं ट्विट

सुरज चव्हाण यांना अटक झाल्यानंतर माजी नगरसेवक अमेय घोले यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी ‘सत्याचा विजय असं ट्विट केलं आहे. अमेय घोले हे देखील आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय होते. पण सुरज चव्हाण यांच्यामुळे अमेय घोले यांनी आदित्य ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

मागे

मुंबई हायकोर्टाची 14 आमदारांना नोटीस, उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार?
मुंबई हायकोर्टाची 14 आमदारांना नोटीस, उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणा....

अधिक वाचा

पुढे  

युवा सेनेचा कार्यकर्ता ते थेट ठाकरे गटाचा सचिव, ईडीने अटक केलेले कोण आहे सुरज चव्हाण?
युवा सेनेचा कार्यकर्ता ते थेट ठाकरे गटाचा सचिव, ईडीने अटक केलेले कोण आहे सुरज चव्हाण?

युवा सेनेचा साधारण कार्यकर्ता ते ठाकरे गटाचा सचिव असा सुरज चव्हाण यांचा प्....

Read more