ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

युवा सेनेचा कार्यकर्ता ते थेट ठाकरे गटाचा सचिव, ईडीने अटक केलेले कोण आहे सुरज चव्हाण?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 18, 2024 09:44 AM 2019-02-12T14:15:30+5:30

युवा सेनेचा कार्यकर्ता ते थेट ठाकरे गटाचा सचिव, ईडीने अटक केलेले कोण आहे सुरज चव्हाण?

शहर : मुंबई

युवा सेनेचा साधारण कार्यकर्ता ते ठाकरे गटाचा सचिव असा सुरज चव्हाण यांचा प्रवास आहे. सुरज चव्हाण यांनी वरळी येथील शिवसेना शाखेपासून कामाला सुरवात केली. त्यांच्या कामाचा झपाटा पाहून त्यांना शाखाप्रमुख करण्यात आलं होतं.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू सहकारी सुरज चव्हाण यांना ईडीने अटक केली. मुंबई महापालिकेच्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटका करण्यात आली आहे. ठाकरे गटाने काल घेतलेल्या महा पत्रकार परिषदेत सुरज चव्हाण उपस्थित होते आणि आज त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. सुरज चव्हाण यांची याच प्रकरणात याआधीही ईडीने चौकशी केली होती. सुरज चव्हाण यांना ईडीने केलेली अटक हा आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

कोण आहेत सुरज चव्हाण?

खिचडी घोटाळ्याप्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी सुरज चव्हाण यांची चौकशी केली होती. या पाठोपाठ ईडीने त्यांना चौकशीचे समन्स बजावले. ईडीने त्यांना अनेक तास आपल्या कार्यालयात बसवून ठेवलं. त्यांचा जबाब नोंदवला होता. तसेच, त्यांच्या चेंबूर येथील घरीही ईडीने धाड टाकली होती.

युवा सेनेचा साधारण कार्यकर्ता ते ठाकरे गटाचा सचिव असा सुरज चव्हाण यांचा प्रवास आहे. सुरज चव्हाण यांनी वरळी येथील शिवसेना शाखेपासून कामाला सुरवात केली. त्यांच्या कामाचा झपाटा पाहून त्यांना शाखाप्रमुख करण्यात आलं होतं.

2010 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात युवासेनाप्रमुख म्हणून आदित्य ठाकरे यांच्या नावाची घोषण केली. आदित्य ठाकरे यांच्या या युवा सेनेमध्ये अनेक नव्या तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली. सुरज चव्हाण यांनी स्वतःला युवा सेनेच्या कामात झोकून घेतले. लवकरच आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींमध्ये सूरज चव्हाण यांनी स्थान मिळवले.

आदित्य ठाकरे हे मातोश्रीबाहेर असो किनव त्यांचा राज्यात कुठेही दौरा असो सूरज चव्हाण जे त्यांच्यासोबत कायम असायचे. तसेच. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचे नियोजनही सूरज चव्हाण करत असत. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेने मुंबई विद्यापाठीच्या सिनेट निवडणुक जिंकली. युवा सेनेने सिनेट निवडणुकीत दहाच्या दहा जागा जिंकल्या होत्या. यामागे सूरज चव्हाण यांची रणनिती होती.

दादर येथील शिवसेना भवनातील तिसऱ्या मजल्यावर बसून सुरज चव्हाण युवासेनेचे कामकाज पहात होते. युवासेनेने अनेक आंदोलने केली. निवडणुका जिंकल्या त्या त्यावेळी सूरज चव्हाण यांनी नेहमीच पडदयामागची भूमिका बजावली होती. शिंदे गटाच्या फुटीमुळे पक्षात अनेक नव्याने फेरबदल करण्यात आले. त्यावेळी सुरज चव्हाण यांना पक्षाचे सचिव असे महत्वाचे पद देण्यात आले होते.

चौकशी यंत्रणांकडून सुरज चव्हाण यांची चौकशी सुरू झाली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सूरज चव्हाण यांना बाजूला केल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. एरव्ही सावलीसारखे सोबत असणारे सुरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांच्या आसपासदेखील कमी पाहायला मिळत होते. सुरज चव्हाण यांच्याऐवजी आदित्य ठाकरे यांचे दौऱ्याचे शेड्युल बनविण्याची जबाबदारी रविराज कुलकर्णी यांच्याकडे सोपविण्यात आली होती. युवासेनेचे कोषाध्यक्ष नगरसेवक अमेय घोले यांनी पक्षाचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी अमेय घोले यांनी सूरज चव्हाण यांच्यावर उघड आरोप केले होते.

मागे

ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का, आदित्य ठाकरेंच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्याला अटक
ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का, आदित्य ठाकरेंच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्याला अटक

ठाकरे गटाला सर्वात मोठा झटका बसणारी बातमी समोर आली आहे. युवासेनाप्रमुख आदि....

अधिक वाचा

पुढे  

 ‘धारावीची लोकसंख्या 2.5 लाख, मग 4 लाख लोक अपात्र कसे काय?’ किरीट सोमय्यांचा सवाल
‘धारावीची लोकसंख्या 2.5 लाख, मग 4 लाख लोक अपात्र कसे काय?’ किरीट सोमय्यांचा सवाल

"रवींद्र वायकर प्रकरणात हिशोब द्यावा लागेल. महापालिकेने परवानगी दिली. इकब....

Read more