ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भाजप पदाधिकाऱ्यांच्या ट्रकमध्ये 300 EVM मशीन, खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 31, 2024 12:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजप पदाधिकाऱ्यांच्या ट्रकमध्ये 300 EVM मशीन, खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप

शहर : मुंबई

'EVM है तो मोदी है', अशी बोचरी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यांनी मोदी सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. उत्तर प्रदेशच्या एका दुकानात 200 तर भाजप पदाधिकाऱ्यांच्या ट्रकमध्ये 300 EVM मशीन सापडल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

मोदी सरकारवर विरोधकांनी ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप पुन्हा सुरु केला आहे. ‘EVM है तो मोदी है, अशी बोचरी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. भाजपच्या चंदीगड पॅटर्नमधून या बाबीवर शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ईव्हीएम घोटाळ्याविषयी यापूर्वी पण विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलेला आहे. तर केंद्रीय निवडणूक आयोग हा सरकारचा पोपट असल्याची घणाघाती टीका पण अनेकदा करण्यात आली आहे. राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणानंतर तर मोदी सरकारवर टीकेला अधिक धार आली आहे.

ईव्हीएम तर भाजप पदाधिकाऱ्यांच्या ताब्यात

यावेळी खासदार राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात जोरदार आघाडी उघडली. लोकसभा 2024 निवडणूक जिंकण्यासाठी भाजपच्या नियोजनावर त्यांनी टीका केली. त्यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. उत्तर प्रदेशच्या एका दुकानात 200 तर भाजप पदाधिकाऱ्यांच्या ट्रकमध्ये 300 EVM मशीन सापडल्याचा गंभीर आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केला.

सरळमार्गाने निवडणूक नाही जिंकणार

भाजप सरळ मार्गाने निवडणूक जिंकू शकत नाही, अशी टीका त्यांनी केली. लोकशाहीत भाजप चंदीगड पॅटर्न आणू पाहत आहे. चंदीगडमध्ये लोकशाहीरुपी सीतेचं अपहरण रामभक्तांनीच केल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस आणि आप पक्षाची आठ मते अवैध ठरवून भाजपचा चंदीगडमध्ये महापौर निवडून आणल्याचा आरोप त्यांनी केला.

कुठे सापडल्या ईव्हीएम

उत्तर प्रदेशातील चांडोल येथे एका दुकानात 200 ईव्हीएम मशीन आढळल्या. आसाममध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या नावे असलेल्या एका ट्रकमध्ये 300 ईव्हीएम मशीन सापडल्या. भारत इलेक्ट्रिकल कंपनीच्या संचालकांमध्ये भाजप पदाधिकारी नेमण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. यामध्ये बहुसंख्य लोक हे गुजराती असल्याचा आरोप त्यांनी केला. राजकोट येथील मनसूखभाई हे त्यात आहेत. लोकशाही निवडणुकीत भाजप मनसूख पॅटर्न, चंदीगड पॅटर्न आणू पाहत असल्याची टीका त्यांनी केली.

यावर टाळले बोलणे

शिवसेना पक्षाचा पॅनकार्ड, टॅनकार्डचा तसेच आयकर संबंधित बाबींचा गैरवापर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून केल्याची तक्रार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून ही तक्रार करण्यात आल्याचे विचारल्यावर संजय राऊत यांनी त्यावर बोलणे टाळले.

 

पुढे  

‘सरकारने काढलेली मराठा आरक्षणाची अधिसूचना अंतिम निर्णय नाही’,चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य
‘सरकारने काढलेली मराठा आरक्षणाची अधिसूचना अंतिम निर्णय नाही’,चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा आरक्षणाच्या अधिसूचन....

Read more