ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

१९९९ पासून अनेक एक्झिट पोल चुकीचे ठरत आले आहेत,उपराष्ट्रपतींचा सूचक इशारा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 20, 2019 01:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

१९९९ पासून अनेक एक्झिट पोल चुकीचे ठरत आले आहेत,उपराष्ट्रपतींचा सूचक इशारा

शहर : देश

लोकसभा निवडणुकीचे अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर काही वेळातच विविध वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोल दाखविण्यासाठी चढाओढ सुरू झाली होती. अनेक संस्थांनी विद्यमान भाजप सरकारने बहुमताचा आकडा गाठल्याचे म्हटले आहे. मात्र त्याचवेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विजयाच्या आशेमुळे उत्साहित झालेल्या भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सूचक इशारा दिला आहे.

निवडणुकीनंतर येणारे एक्झिट पोल म्हणजे निवडणुकीचा निकाल नसतो, हे आपण समजून घेणे गरजेचे आहे. १९९९ पासून अनेक एक्झिट पोल चुकीचे ठरत आले आहेत. मतमोजणीपर्यंत प्रत्येकजण आत्मविश्वासाने बोलत असतो. त्याला काहीही आधार नसतो. त्यामुळे निवडणुकीच्या अंतिम निकालांसाठी २३ मे पर्यंत वाट पाहण्याचा सल्ला नायडू यांनी दिला. शुभचिंतकांसोबत आयोजित अनौपचारिक चर्चेत ते बोलत होते.देशाला आणि विविध राज्यांना एका कुशल नेत्याची आणि स्थिर सरकारची आवश्यकता असते, मग तो कोणीही असो. राजकीय पक्षांच्या बदलानुसार समाजात बदल होण्याची गरज, नायडू यांनी यावेळी व्यक्त केली.

१७व्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळून देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर येईल, यावर रविवारी प्रसिद्ध झालेल्या विविध मतदानोत्तर जनमत चाचण्यांच्या (एक्झिट पोल) अंदाजांमध्ये एकवाक्यता दिसून आली. ‘एक्झिट पोलचे अंदाज बहुतेक वेळा सपशेल चुकतात, हा पूर्वीचा अनुभव लक्षात घेता, भारतीय मतदारांनी वास्तवात दिलेला कौल काय आहे, हे येत्या गुरुवारी २३ मे रोजी होणाऱ्या मतमाजणीनंतरच स्पष्ट होईल.

मागे

राज्यात भाजपा-शिवसेना युती 45 जागा जिंकणार -  रावसाहेब दानवेचा दावा
राज्यात भाजपा-शिवसेना युती 45 जागा जिंकणार - रावसाहेब दानवेचा दावा

लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या देशाचे लक्ष निकालांकडे लागून राहिलं आहे. यंदाच....

अधिक वाचा

पुढे  

चारा छावण्या आणि पीक कर्जासाठी काँग्रेसतर्फे रास्ता रोको, ६५ कार्यकर्ते ताब्यात
चारा छावण्या आणि पीक कर्जासाठी काँग्रेसतर्फे रास्ता रोको, ६५ कार्यकर्ते ताब्यात

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याबाबत....

Read more