ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ४ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 16, 2020 04:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ४ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी 

शहर : रत्नागिरी

     रत्नागिरी - विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने महाविकास आघाडी करीत सत्ता हस्तगत केली. मात्र राज्याच्या स्थानिक पातळीवर ज्या निवडणुका होतात त्यात अजूनही या महाविकास आघाडीत सामंजस्य निर्माण झालेले दिसत नाही. म्हणूनच रत्नागिरीत विधानसभा आणि नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणूकीत शिवसेनेला साथ देत पक्षविरोधी काम करणार्‍या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ४ नगरसेवकांची हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आणि नगरपालिकेतील गटनेते सुरेश मयेकर यांनी दिली. 


        या संदर्भात अधिक माहिती अशी की, रत्नागिरी नगर परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाच नगरसेवक आहेत. यातील कौशल्या शेटये, उज्ज्वला शेटये, मुसा काझी व मिरकडवाडा येथील सोहेल सावरकर यांनी विधानसभा निवडणुकीत व नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला साथ देत पक्षविरोधी काम केले. त्यामुळे या चौघा नागसेवकांना लेखी स्वरुपात राजीनामा देण्याचे आदेश गटनेते सुदेश मयेकर यांनी दिले होते. पक्षाच्या अशा स्वरूपाच्या नोटिसीला एकाही नागसेवकाने लेखी उत्तर दिलेले नाही. त्यामुळे गटनेते मयेकर यांनी आक्रमक भूमिका घेत या चौघांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.         

मागे

कुमार विश्वास भाजपमध्ये सामील होणार? कवीने काय उत्तर दिले ते जाणून घ्या
कुमार विश्वास भाजपमध्ये सामील होणार? कवीने काय उत्तर दिले ते जाणून घ्या

आम आदमी पक्षाचे कवी आणि बंडखोर नेते कुमार विश्वास यांनी बुधवारी सूक्ष्म ब्....

अधिक वाचा

पुढे  

नितिन गडकरींनी २२ आमदारांची केली सीबीआकडे तक्रार 
नितिन गडकरींनी २२ आमदारांची केली सीबीआकडे तक्रार 

     नवी दिल्ली - केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी ....

Read more