ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न 'बेटी पंकजा' पुर्ण करतेयं - पंतप्रधानांचे प्रशस्तीपत्र 

By Anuj Kesarkar | प्रकाशित: ऑक्टोबर 17, 2019 08:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न 'बेटी पंकजा' पुर्ण करतेयं - पंतप्रधानांचे प्रशस्तीपत्र 

शहर : मुंबई

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- माझे मित्र गोपीनाथ मुंडे यांचे विकासाचे स्वप्न "बेटी पंकजा" पुर्ण करीत आहे असे प्रशस्तीपत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ना. पंकजाताई मुंडे यांना देत त्या करीत असलेल्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. मोदी यांच्या आज परळीत झालेल्या ऐतिहासिक सभेने ना. पंकजाताई मुंडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. महायुतीचे सर्वच उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होतील असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. तर मोदी यांच्या येण्याने जिल्ह्याच्या विकासाची नवी पहाट झाली असुन विकासाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी निधी कमी पडू देणार नाहीत असा विश्वास ना. पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला. 

     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बीड जिल्ह्य़ातील महायुतीच्या उमेदवारांसाठी वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील मैदानावर जाहीर सभा घेतली. सभेला अक्षरशः जनसागर उसळला होता. यावेळी बोलताना ते म्हणाले की, माझे मित्र दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कर्मभूमीत आल्याचा आनंद होत आहे. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचे विकासाचे स्वप्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे पूर्ण करीत आहेत. मराठवाडा हा कायम दुष्काळी राहिला आहे. मात्र आगामी काळात दुष्काळ मुक्त मराठवाडा घडवायचा आहे. " हर घर जल" या संकल्पनेने दुष्काळावर मात करायची आहे. मराठवाड्यात जलसंधारण, जलसिंचनाचे प्रकल्प राबवून गोदावरीचे पाणी आणायचे आहे. त्यासाठी वाॅटर ग्रीड योजना राबवून मराठवाडा पाणीदार करायचा असल्याचे त्यांनी सांगितले. 

थकलेल्या लोकांची गरजच काय?

यावेळी मोदी यांनी कमजोर विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना पराजीत भावनेने पछाडले आहे. ते दोघेही आता थकुन गेले आहेत ते काय तुमचा विकास करणार? असा सवाल करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे स्वार्थ शक्तीने प्रभावीत आहेत तर भाजप महायुती कर्मशक्तीने प्रभावीत आहे. जनता नेहमी कर्मशक्तीवर प्रेम करते असे सांगून बीड जिल्ह्याने नेहमी महायुतीला साथ दिली आहे. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार हे रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज सभेला मिळालेला प्रतिसाद पाहून तर विरोधक गर्भगळित होतील असे सांगून ते म्हणाले की, महायुतीकडे जीव लावून काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्याकडे भ्रष्टाचारी कार्यकर्ते आहेत. त्यांच्याकडील चांगले लोक त्यांना सोडून गेल्याने तेथे केवळ थकलेले आणि पराभूत लोक राहिले आहेत ते काय तुमचा विकास करणार असा सवाल करून महायुती सरकारने पाच वर्षांच्या कालावधीत अतिशय चांगले काम केले आहे. जनता कामाची पावती नक्की देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ३७० कलमाचा विरोध करणाऱ्या विरोधकांना  धडा शिकविण्याची पहिली संधी  महाराष्ट्राला आली असून आपण यांना धडा शिकविणार का असा प्रश्न उपस्थितांना करून देश भावना विरोधी काम करणारांना धडा शिकविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. कलम रद्द करण्याचा निर्णय आम्ही राजनितीसाठी नाही देशहितासाठी घेतला आहे आणि अपेक्षित बदल घडताना दिसत आहे. विरोधकांनी यावरून फार टीका केली. पण जनतेने मात्र डोक्यावर निर्णयाचे स्वागत केले आहे आणि त्याची पावती या निवडणुकीत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
        गेल्या पाच वर्षात गॅस, घरे, शौचालय, वीज कनेक्शन आदीबाबत सरकारने काम केले असून पुढील पाच वर्षात "जल जीवन मिशन" वर काम करणार असून घराघरात पाणी ही संकल्पना राबविली जाणार असून त्यासाठी करोडो रुपये खर्च केले जात असल्याचे ते म्हणाले. पीक विमा आणि वेगवेगळ्या अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम आम्ही केले असुन साठ वर्षे पूर्ण झालेल्या अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, घरकाम करणारे मजुर यांना ३०० रूपये पेन्शन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आत्तापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले तुमच्या पैशावर डल्ला मारीत होते. आम्ही थेट बँक खात्यात पैसे देत असल्याने भ्रष्टाचार कमी होऊन तुम्हाला योग्य रक्कम मिळत आहे. आगामी काळातही शेतकरी आणि मजुरांसाठी विविध योजना राबवायच्या आहेत. 

पंकजाताईंच्या कामाचे कौतुक

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे परळी - बीड - नगर रेल्वे मार्ग पुर्ण करण्याचे स्वप्न त्यांची मुलगी पुर्ण करीत आहे. गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाची स्थापना करून त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. बीड जिल्ह्य़ात रस्ते, पाणी आल्याने उद्योगासाठी चांगले वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे आगामी काळात मोठे उद्योग, प्रकल्प आणुन येथील युवकांच्या हाताला काम मिळेल असे सांगून ना. पंकजाताई मुंडे यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळवून दिला आहे. या चळवळीला आणखी बळ देणार असल्याचे सांगून महिलांनी या निवडणुकीत अधिक प्रमाणात मतदान करून महिला मताचा टक्का वाढवावा असे आवाहन त्यांनी केले. महायुतीच्या सर्व उमेदवारांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 

मोदींच्या येण्याने विकासाची पहाट - ना. पंकजाताई मुंडे

पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांच्या येण्याने बीड जिल्ह्याच्या विकासाची नवी पहाट झाली असून विककासाला आणखी गती वाढेल असा महायुतीच्या उमेदवार, ना. पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला. 
     नरेंद्र मोदी आले की विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध करून देतात हा आपला अनुभव जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत असे सांगुन महाराष्ट्रात पुन्हा भाजपाचे सरकार येणार आहे आपण महायुतीचे सर्व उमेदवार विजयी करून सत्तेतील टक्का वाढवावा असे आवाहन त्यांनी केले. 
     यावेळी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्यासह आ. सुरेश धस, आष्टीचे उमेदवार आ. भिमराव धोंडे, बीडचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर, गेवराईचे उमेदवार लक्ष्मण पवार, माजलगावचे उमेदवार रमेश आडसकर, केजच्या उमेदवार नमिता मुंदडा आदींची भाषणे झाली. व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, जेष्ठ नेते प्रा. टी.पी. मुंडे, तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे, नेताजी देशमुख आदी उपस्थित होते. 

नरेंद्र मोदी यांची सभा वैद्यनाथ महाविद्यालया समोरील मैदानावर आयोजित करण्यात आली होती, सकाळी ११.५० वा. हवाई दलाच्या तीन विशेष हेलिकाॅप्टरने त्यांचे आगमन झाले. सभेला जाण्यापूर्वी मोदींनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले व अभिषेकही केला. 

 नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरवात मराठीतून केली. 'वैद्यनाथाच्या पावनभूमीत व माझे मित्र गोपीनाथ मुंडेच्या कर्मभूमीत मी आलो आहे, संताच्या या भूमीत माझा सर्वाना नमस्कार' असे म्हणताच टाळ्यांचा एकच कडकडाट 

 मोदींनी ३३ मिनीटं २६ सेकंद भाषण केले.  काश्मिर पासून परळी पर्यंतचे सर्व मुद्दे त्यांनी मांडले. विशेष म्हणजे पुरूषांपेक्षा अधिक मतदान करण्याचे आवाहन त्यांनी हजारोंच्या संख्येने  उपस्थित राहिलेल्या महिला भगिनींना   केले, याचे महिलांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.

ना. पंकजाताई मुंडे यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे, पती डाॅ. अमित पालवे, अॅड. यशःश्री मुंडे यांनी लोकांमध्ये बसून भाषण ऐकले. 

 कार्यक्रमाचे संचलन खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी अतिशय सुरेख केले.

 ना. पंकजाताई मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथाची चांदीची पिंड, प्रतिकात्मक  रेल्वे देऊन तसेच गुलाबाचा पुष्पहार घालून मोदींचा सत्कार केला. 

 सभेतील मुस्लिम महिलांची उपस्थिती लक्षवेधी होती तसेच बचतगटांच्या महिलांनी मोठी गर्दी केली होती. मोदी व्यासपीठावर येताच प्रचंड गर्दीतून टाळ्यांचा  कडकडाट, ' मोदी, मोदी ' असा एकच जयघोष झाला, हा उत्साह भाषणाच्या दरम्यानही सुरूच होता.

 सर्व सामान्य माणसाला त्यांच्या भाषणाची मोठी उत्सुकता होती,  शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, महिला व सर्व स्तरातील नागरिकांनी लावलेली उपस्थिती हेच दर्शवत होती.  

 जिकडे पहावे तिकडे गर्दीच गर्दी दिसत होती, सभेला जनसागराचे स्वरूप आले. लोकांनी मिळेल त्या जागेवर बसून मोदींचे विचार ऐकले. मैदाना समोरील  डोंगरावर बसून देखील लोक सभा ऐकत होते. 

 पंतप्रधानांचा दौरा असल्याने राज्यभरातून पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला. नेहमीची वाहतूकही वळविण्यात आली.

मागे

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍या भाजपाला धडा शिकवा
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍या भाजपाला धडा शिकवा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  व्यासपिठावर मतांसाठी छत्रपती शिवरायांचा जयजयक....

अधिक वाचा

पुढे  

10 कलमी वचननामाच पुर्ण करता आला नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा - धनंजय मुंडे
10 कलमी वचननामाच पुर्ण करता आला नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा - धनंजय मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  राज्यात आणि केंद्रात सत्ता, पाच वर्ष चार महत्वाच....

Read more