ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मोदी पुन्हा सत्तेत आले तर अमित शाह गृहमंत्री-अरविंद केजरीवाल

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 02:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मोदी पुन्हा सत्तेत आले तर अमित शाह गृहमंत्री-अरविंद केजरीवाल

शहर : delhi

लोकसभा निवडणूकी देशात नरेंद्र मोदी हे पुन्हा सत्तेवर आले तर अमित शाह हे देशाचे गृहमंत्री असतील, असा दावा आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. ज्या देशाचा गृहमंत्री अमित शाहसारखा व्यक्ती असेल, त्या देशाची परिस्थिती काय होईल, याचा विचार करुन जनतेने मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीतील सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सातही जागांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले आहे. ट्विटमध्ये केजरीवाल म्हणतात, देशातील नागरिकांनी मतदान करताना फक्त इतकाच विचार करावा की नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर अमित शाहसारखी व्यक्ती गृहमंत्रीपदी विराजमान होईल आणि ज्या देशाचा गृहमंत्री अमित शाहसारखा व्यक्ती असेल त्या देशाची परिस्थिती काय असेल. दरम्यान, दिल्लीतील सातही जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. दिल्लीत भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होत असून, त्याचा फायदा भाजपलाच होऊ शकतो. दिल्लीत आघाडी करावी, असा प्रस्ताव आम आदमी पार्टीने काँग्रेसपुढे ठेवला होता, पण दिल्लीतील काँग्रेसनेत्यांनी त्यास नकार दिला होता.

मागे

तर आरएसएसने मोदींना पंतप्रधान होऊच दिलं नसते: मायावती
तर आरएसएसने मोदींना पंतप्रधान होऊच दिलं नसते: मायावती

राजकीय स्वार्थासाठी आपण मागास जातीचे असल्याचं ढोंग मोदी करत आहेत, असा घणाघ....

अधिक वाचा

पुढे  

काँग्रेसचे 20 आमदार नाराज, केव्हाही करू शकतात पक्षांतर; येडियुरप्पांचा दावा
काँग्रेसचे 20 आमदार नाराज, केव्हाही करू शकतात पक्षांतर; येडियुरप्पांचा दावा

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक राज्यातील राजकीय हालचाली थंडावल्या आहे. आ....

Read more