ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तर आरएसएसने मोदींना पंतप्रधान होऊच दिलं नसते: मायावती

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 01:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

तर आरएसएसने मोदींना पंतप्रधान होऊच दिलं नसते: मायावती

शहर : kolkata

राजकीय स्वार्थासाठी आपण मागास जातीचे असल्याचं ढोंग मोदी करत आहेत, असा घणाघात बसपा प्रमुख मायावती यांनी केला आहे. सपा-बसपा महाआघाडीवर केलेल्या जातीयवादाच्या टीकेला सडेतोड उत्तर देताना मायावती यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.
उत्तर प्रदेशात अनेक महत्त्वाच्या जागांवर 12 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या बहुतांश सभांमध्ये सपा-बसपा महाआघाडीला लक्ष केलं आहे. सपा-बसपाची महाआघाडी जातीयवादाचे राजकारण करतं आहे, असा आरोप मोदींनी केला होता. आता याच आरोपाला मायावतींनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे. 
‘सपा-बसपा जातीयवादाचे राजकारण करत आहेत असं म्हणणं हे अपरिपक्वतेचं लक्षण आहे. ज्यांनी जातीयवादाचे चटके सोसले आहे ते त्याचं राजकारण कसं करतील? जातीयवादाची झळ कधी मोदींना लागलेली नाही. त्यामुळेच ते अशी विधानं करू शकतात’.अशी टीका मायावती यांनी केली आहे. 
तसंच मोदी काही मागास जातीचे नाहीत. पण मतांसाठी ते स्वत:ला मागास म्हणवून घेत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. ‘मोदी जर खरोखर मागास असते तर संघाने त्यांना पंतप्रधान केलंच नसतं. कल्याण सिंह यांची भाजपने काय दशा केली हे सगळ्यांनाच माहीत आहे.’, असा टोलाही त्यांनी हाणला. कल्याण सिंह हे उत्तर प्रदेशात लोधी समाजाचे नेते असून ही एक अत्यंत मागास जात आहे. आता मोदी या टीकेचे कसे प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पुढे  

मोदी पुन्हा सत्तेत आले तर अमित शाह गृहमंत्री-अरविंद केजरीवाल
मोदी पुन्हा सत्तेत आले तर अमित शाह गृहमंत्री-अरविंद केजरीवाल

लोकसभा निवडणूकी देशात नरेंद्र मोदी हे पुन्हा सत्तेवर आले तर अमित शाह हे देश....

Read more