ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पालघरचे शिवसेनेचे श्रीनिवास वनगा विजयी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 24, 2019 12:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पालघरचे शिवसेनेचे श्रीनिवास वनगा विजयी

शहर : मुंबई

विधानसभा निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. पालघर विधानसभेत शिवसेनेचा फगवा फडकला आहे. शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांचा विजय झाला आहे. श्रीनिवास वनगा यांनी काँग्रेसच्या योगेश नम यांचा पराभव केला आहे. पालघरमधून काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

पालघर विधानसभेचा उमेदवार देताना यावेळी शिवसेनेने हिम्मत दाखवली असून आमदार घोडा कृष्ण अर्जून यांचं तिकिट कापून पक्षातील श्रीनिवास वनगा यांनी उमेदवारी जाहीर केली. यानंतर घोडा यांनी बंडखोरी दाखवत राष्ट्रवादीत प्रवेश केला. पण त्याच गतीने त्यांनी घर वापसी केली. यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. असा सगळा गोंधळ असताना काँग्रेसने योगेश नम यांना उमेदवारी देऊन तिथला कोटा पूर्ण केला. यावरूनच निवडणूकीत कोणत्या पक्षात किती दम आहे हे स्पष्ट झाले होते. अखेर विधानसभा निवडणुकीच्या निकालाने आता हे चिन्ह अधोरेखित केलं आहे.

पालघर विधानसभेत एकूण 2 लाख 73 हजार 591 मतदार आहेत. यामध्ये आदिवासी मतदारांची संख्या अधिक आहे. पालघर जिल्ह्यात खासदार चिंतामन वनगा यांच्या निधनानंतर पोट निवडणूकीत भाजपाने त्यांचा मुलगा श्रीनिवास वनगा यांना तिकिट दिलं नाही. त्याजागी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या राजेंद्र गावित यांना तिकीट देण्यात आलं. यावर नाराज झालेल्या श्रीनिवास वनगा यांनी नाराज होऊन मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि लोकसभा पोट निवडणूक लढली.

या निवडणूकीत भाजपचे राजेंद्र गावित विजयी झाले आणि श्रीनिवास वनगा हे दुसऱ्या क्रमांकावर राहून वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले. आणि याचा फायदा वनगा यांना विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला. काँग्रेसने उमेदवार योगेश नम यांना सीपीएम, बहुजन विकास आघाडी आणि एनसीपी यांचे समर्थन दिले. तर अमित घोडा पुन्हा शिवसेनेत आल्यामुळे त्यांची ताकद वाढली. या सगळ्याचा फायदा आताच्या निवडणूकीत झाला आहे.

 

मागे

शिवसेनेचे अजय चौधरी ४० हजार तर कुडाळकर ४८ हजार मतांनी विजयी
शिवसेनेचे अजय चौधरी ४० हजार तर कुडाळकर ४८ हजार मतांनी विजयी

विधानसभा निवडणुकीचे कल आता स्पष्ट होऊ लागले आहेत. यानुसार महायुतीला पुन्हा....

अधिक वाचा

पुढे  

रत्नागिरीतून शिवसेनेचे उदय सामंत, तर कणकवलीतून नितेश राणे विजयी
रत्नागिरीतून शिवसेनेचे उदय सामंत, तर कणकवलीतून नितेश राणे विजयी

कोकणात रत्नागिरीतून उदय सामंत यांनी तर सिंधुदुर्गातून नितेश राणे तर श्रीव....

Read more