ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मनसे पुन्हा मैदानात उतरण्यास तयार? निवडणुकीबाबत केली मागणी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 24, 2019 08:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मनसे पुन्हा मैदानात उतरण्यास तयार? निवडणुकीबाबत केली मागणी

शहर : मुंबई

महाराष्ट्राच्या राजकारणात 23 नोव्हेंबरला मोठी उलथापालथ झाली. शनिवारी पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गट यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर पवार कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला. दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांनी सर्वोच्च न्यायालयात नव्या सरकाराविरोधात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज युक्तिवाद झाल्यानंतर सोमवारी (25 नोव्हेंबरला) सुनावणी होणार आहे.

तब्बल 24 ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. त्यानंतर एकाही पक्षाला सरकार स्थापनेचा दावा केला नाही, त्यामुळं महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. मात्र अचानक शनिवारी भाजपनं भल्या पहाटे सत्ता स्थापनेचा दावा करत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उप-मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेनंतर राज्यात मोठा भूकंप झाला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला काँग्रेस-राष्ट्रवादी आणि सेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे. एकीकडे महाराष्ट्रात भुकंप सुरू असतानान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. संदीप देशपांडे यांनी, “राज्यातल्या चारही प्रमुख पक्षांची नैतिक पातळी घसरली आहे, त्यामुळे एक राजकीय कार्यकर्ता आणि मतदार म्हणून पुन्हा एकदा जनादेश घ्यायला हवा”, अशी पोस्ट संदीप देशपांडे यांनी आपल्या फेसबूकवर टाकली आहे.

 

मागे

'मला उभं-आडवं चिरलं तरी...', राष्ट्रवादीच्या नेत्याकडे अजित पवारांनी व्यक्त केल्या भावना
'मला उभं-आडवं चिरलं तरी...', राष्ट्रवादीच्या नेत्याकडे अजित पवारांनी व्यक्त केल्या भावना

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपला पाठिंबा दिला आहे. या ....

अधिक वाचा

पुढे  

महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये भाजपसाठी गेमचेंजर बनले राज्यपाल
महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये भाजपसाठी गेमचेंजर बनले राज्यपाल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाने सरकारस्थापनेचा दावा ....

Read more