ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सर्वाधिक कमी काळ मुख्यमंत्रीपदाचा विक्रम फडणवीसांच्या नावावर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 26, 2019 04:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सर्वाधिक कमी काळ मुख्यमंत्रीपदाचा विक्रम फडणवीसांच्या नावावर

शहर : मुंबई

भाजपचे विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक कमी काळ मुख्यमंत्रीपद भुषविण्याचा विक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, आपले सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही हे लक्षात आल्यानंतर अवघ्या चार दिवसांत देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली आहे.

यापूर्वी पी.के. सावंत उर्फ बाळासाहेब सावंत यांच्या नावावर सर्वाधिक कमी काळ मुख्यमंत्रीपद भुषविण्याचा विक्रम होता. तत्कालीन मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांचे निधन झाल्यानंतर २५ नोव्हेंबर १९६३ ते ४ डिसेंबर १९६३ या काळात बाळासाहेब सावंत यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली होती. हा कालावधी नऊ दिवसांचा होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्यावर अवघ्या चार दिवसांत मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याची वेळ ओढावली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाची पहिली टर्म यशस्वीपणे पूर्ण केली होती. काँग्रेसचे वसंतराव नाईक यांच्यानंतर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले होते. त्यामुळे दुसऱ्या टर्ममध्येही ते चमत्कार करून दाखवणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. मात्र, त्यांची ही खेळी सपशेल अपयशी ठरली.

मागे

उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री, संजय राऊतांचा दावा
उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री, संजय राऊतांचा दावा

महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शनिवारी उपमुख्यमंत्र....

अधिक वाचा

पुढे  

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मी राज्यपालांकडे सोपवतोय- देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मी राज्यपालांकडे सोपवतोय- देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी अखेर आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आपण राज्यपालां....

Read more