ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

विखेंच्या भाचीने करुन दाखवलं, राष्ट्रवादीच्या आमदाराची दहा वर्षांची सत्ता खालसा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 18, 2021 01:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

विखेंच्या भाचीने करुन दाखवलं, राष्ट्रवादीच्या आमदाराची दहा वर्षांची सत्ता खालसा

शहर : shirdi

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीने काकडी गावाची सत्ता गमावली. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)  यांच्या भाची आणि माजी भाजप आमदार स्नेहलता कोल्हे (Snehalata Kolhe) यांच्या गटाचा विजय झाला. तर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांच्या गटाला पराभवाची धूळ चाखावी लागली. कोपरगावात काकडी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या गटाने सत्ता खेचून आणली. गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या गटाची काकडी गावात सत्ता होती. यंदा भाजपच्या स्नेहलता कोल्हे गटाने 11 पैकी 8 जागांवर विजय मिळवला.

कोण आहेत स्नेहलता कोल्हे?

स्नेहलता कोल्हे या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या माजी आमदार 2019 च्या विधानसभा निवडणुकीत स्नेहलता कोल्हे यांचा पराभव स्नेहलता कोल्हे या भाजपचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाची

शिर्डी विमानतळासाठी निधीची घोषणा

काकडी गावात शिर्डी विमानतळ असल्याने मुख्यत्वे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली. निवडणुकीच्या‌ तोंडावर आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून 300 कोटींचा निधी विमानतळ आणि गावाच्या विकासासाठी देण्याची घोषणा करुन घेतली होती, परंतु मतदारांनी कौल भाजपच्या पारड्यात टाकल्याचं दिसत आहे.

विखे पाटलांना मूळगावी धक्का

भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना त्यांच्या मूळगावी मोठा धक्का बसला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी खूर्द गावातील 20 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. लोणी खूर्द गावामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांच्या समर्थकांच्या पॅनेलला अवघ्या 4 जागांवर विजय मिळाला आहे. 

लोणी खुर्द गावात सत्तांतर

लोणी खुर्द हे राधाकृष्ण विखे-पाटलांचं गाव आहे. या गावात विखे पाटलांची 20 वर्षांपासून सत्ता होती. 17 पैकी 13 जागांवर परिवर्तन पॅनेलनं विजय मिळवल्यानं अवघ्या 4 जागांवर विखे पाटील समर्थकांचं पॅनेल विजयी झाले.

मागे

मालवणमध्ये वैभव नाईकांना धक्का; नितेश राणेंनी गड राखले!
मालवणमध्ये वैभव नाईकांना धक्का; नितेश राणेंनी गड राखले!

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना मालवण ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा धक्का बस....

अधिक वाचा

पुढे  

अण्णांच्या राळेगणसिद्धीत कुणाची सत्ता?
अण्णांच्या राळेगणसिद्धीत कुणाची सत्ता?

पाटोद्यात आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या पॅनलाचा पराभव झाल्यान....

Read more