ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

एकनाथ खडसेंचा धमाका; मुक्ताईनगरमध्ये भाजपचा उडाला धुव्वा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 18, 2021 12:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एकनाथ खडसेंचा धमाका; मुक्ताईनगरमध्ये भाजपचा उडाला धुव्वा

शहर : जळगाव

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर स्थानिक पातळीवर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचा पुरता धुव्वा उडाला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील 47 ग्रामपंचायतींपैकी नऊ गावांमध्ये महाविकासआघाडी पुरस्कृत पॅनलचा विजय झाला आहे. तर इतर गावांमध्येही महाविकासआघाडी पुरस्कृत पॅनल्सची जोरदार घौडदौड सुरु आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तरी भाजपला फारसा फरक पडणार नाही. भाजपकडे त्यांची उणीव भरुन काढणारे नेते असल्याचा दावा गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र, आता मुक्ताईनगरमधील निकाल पाहता या संपूर्ण पट्ट्यात एकनाथ खडसे यांचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे.

कोथळी ग्रामपंचायतीच्या निकालांवरुन खडसे परिवारात ‘गृहयुद्ध

कोथळी ग्रामपंचायतीच्या निकालांवरुन खडसे परिवारात गृहयुद्ध सुरु झाले आहे. याठिकाणी पाच जागांवर शिवसेना तर सहा जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले. मात्र, आता भाजप आणि राष्ट्रवादीकडून आपल्या विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. कोथळी हे एकनाथ खडसे यांचे गाव आहे.

गिरीश महाजनांनी वर्चस्व राखले

गिरीश महाजन यांनी जामनेर तालुक्यातील आपले वर्चस्व राखले आहे. तालुक्यातील 90 टक्के ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकली आहे. मात्र, काही ठिकाणी  राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी मुसंडी मारली आहे.

खानापुरात चंद्रकांत पाटलांना हरवलं, सेनेचा झेंडा

शिवसेनेने चंद्रकांत पाटील यांच्या मूळ गावातील खानापूर गावात सत्तांतर घडवलं आहे. खानापूरमध्ये सेनेनं 6 जागांवर विजय मिळवला आहे. खानापूरमधील शिवसेनेचा विजय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतानाही खानापूरमध्ये ही अनोखी युती झाली होती. स्थानिक पातळीवर का असेना, पण शिवसेनेविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी शड्डू ठोकत चक्क भाजपशी आघाडी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं गेलं होते. मात्र, तरीही शिवसेनेच्या प्रकाश आबिटकरांनी विजय खेचून आणला.

मागे

धनंजय मुंडेंचा परळीत विजयी षटकार, 8 पैकी 6 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची टिक टिक
धनंजय मुंडेंचा परळीत विजयी षटकार, 8 पैकी 6 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची टिक टिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) या....

अधिक वाचा

पुढे  

मेव्हणे मेव्हणे मेव्हण्यांचे पाहुणे, जयंत पाटलांचे सगळेच हरले!
मेव्हणे मेव्हणे मेव्हण्यांचे पाहुणे, जयंत पाटलांचे सगळेच हरले!

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला आह....

Read more