ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

धनंजय मुंडेंचा परळीत विजयी षटकार, 8 पैकी 6 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची टिक टिक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 18, 2021 12:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

धनंजय मुंडेंचा परळीत विजयी षटकार, 8 पैकी 6 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची टिक टिक

शहर : बीड

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गटानं परळीमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. परळी तालुक्यातील निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये भाजपला दारुण पराभावाला सामोरं जावं लागले आहे. परळी तालुक्यातील 8 पैकी 6 ग्रामपंचायतींवर धनंजय मुंडे यांच्या गटानं विजय मिळवला. परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या गटानं पुन्हा एकदा वर्चस्व दाखवून दिलं आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. परळी तालुक्यातील 8 पैकी 6 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीनं वर्चस्व मिळवलं आहे. परळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय झाला आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. परळी तालुक्यातील 8 पैकी वंजारवाडी, रेवली, सरफराजपूर, मोहा, गडदेवाडी, वंजारवाडी , लाडझरी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीनं विजय मिळवला आहे.

राष्ट्रवादींनं विजय मिळवलेल्या ग्रामपंचायती

1 वंजारवाडी बिनविरोध

2 रेवली बिनविरोध

3 सरफराजपुर

4 मोहा

5. लाडझरी

6. गडदेवाडी

परळी तालुक्यातील रेवली आणि वंजारवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती. या दोन्ही ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे गेल्या होत्या. भोपळा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या गटानं विजय मिळवला आहे.

ग्रामपंचायत निकालातील महत्वाच्या घडामोडी

भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना त्यांच्या मूळगावी मोठा धक्का बसला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी खूर्द गावातील 20 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला. लोणी खूर्द गावामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांच्या समर्थकांच्या पॅनेलला अवघ्या 4 जागांवर विजय मिळाला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या गावातही सत्तांतर

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या गावातच काँग्रेस-राष्ट्रवादीशी भाजपने हातमिळवणी केल्याचं समोर आलं होत. मात्र, शिवसेनेनं चंद्रकांत पाटील यांच्या गावातील 6 जागांवर विजयी सलामी दिली आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी तिन्ही पक्षाचे स्थानिक नेते एकत्र आले होते. कोल्हापुरातील खानापूर ग्रामपंचायतीसाठी झालेल्या या अनोख्या आघाडीची राज्यभर चर्चा सुरु झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील खानापूरच्या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली होती. खानापूरमध्ये शिवेसना आमदार प्रकाश आबिटकरांन चंद्रकांत पाटील यांच्या ताब्यातील खानापूर ग्रामपंचायत खेचून आणली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचा लेखाजोखा

निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234

आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711

एकूण प्रभाग- 46,921

एकूण जागा- 1,25,709

प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221

अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024

वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197

मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719

बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718

अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880

 

मागे

चंद्रकांतदादा, विखे-पाटील, राणेंना धक्का; भाजपच्या दिग्गजांनी गावातल्या ग्रामपंचायती गमावल्या
चंद्रकांतदादा, विखे-पाटील, राणेंना धक्का; भाजपच्या दिग्गजांनी गावातल्या ग्रामपंचायती गमावल्या

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे अत्यंत धक्कादायक निकाल हाती येत आहेत. या ....

अधिक वाचा

पुढे  

एकनाथ खडसेंचा धमाका; मुक्ताईनगरमध्ये भाजपचा उडाला धुव्वा
एकनाथ खडसेंचा धमाका; मुक्ताईनगरमध्ये भाजपचा उडाला धुव्वा

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर स्थानिक पात....

Read more