ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

किरीट सोमय्यांचा पत्ता कट ! मनोज कोटक यांना भाजपकडून उमेदवारी ?

By GARJA ADMIN | प्रकाशित: एप्रिल 01, 2019 07:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

किरीट सोमय्यांचा पत्ता कट !  मनोज कोटक यांना भाजपकडून उमेदवारी ?

शहर : मुंबई

ईशान्य मुंबईचे भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कापल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाने सोमय्या यांच्याऐवजी नगरसेवक मनोज कोटक यांचे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेचा कडवा विरोध असल्याने सोमय्यांचे तिकीट कापण्याशिवाय भाजपकडे पर्याय राहिला नव्हता. सोमय्यांना उमेदवारी दिल्यास शिवसेना त्यांचे काम करणार नाही असा इशारा शिवसेनेने भाजपला दिला होता.

किरीट सोमय्या यांनी २०१४ साली ईशान्य मुंबईतून मोठा विजय मिळवला होता. मात्र, २०१४ मध्ये शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर सोमय्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते. उद्धव ठाकरे यांना माफिया असेही त्यांनी संबोधले होते. तसेच मुंबई महापालिकेत बांधकाम परवाना देताना बांधकाम व्यावसायिकांकडून हप्ते व टक्केवारी कशी घेतली जाते याचे जाहीर वाभाडे काढले होते. मात्र, आता मोदी लाट ओसरल्यानंतर भाजपला शिवसेनेसोबत युतीची गरज भासली. त्यामुळे युती झाल्यानंतर भाजपने शिवसेनेच्या कलाने घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे भाजपने सोमय्या यांच्याऐवजी मनोज कोटक यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली असून, आज किंवा उद्या कोटक यांचे नाव जाहीर होईल असे भाजपमधील सूत्रांनी स्पष्ट केले.

मागे

loksabha election 2019: फेसबुकने काँग्रेसची 687 पेज हटवली
loksabha election 2019: फेसबुकने काँग्रेसची 687 पेज हटवली

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चरणातील मतदानाला काही दिवस राहीले आहेत. या पार....

अधिक वाचा

पुढे  

loksabha 2019 : मनसेचा काँग्रेसला पाठिंबा, संजय निरूपमना मात्र ठेंगा!
loksabha 2019 : मनसेचा काँग्रेसला पाठिंबा, संजय निरूपमना मात्र ठेंगा!

आगामी लोकसभा निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा देत उमेदवारांचा प्....

Read more