ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

loksabha 2019 : मनसेचा काँग्रेसला पाठिंबा, संजय निरूपमना मात्र ठेंगा!

By GARJA ADMIN | प्रकाशित: एप्रिल 01, 2019 07:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

loksabha 2019 : मनसेचा काँग्रेसला पाठिंबा, संजय निरूपमना मात्र ठेंगा!

शहर : मुंबई

आगामी लोकसभा निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा देत उमेदवारांचा प्रचार करण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. एकीकडे एकनाथ गायकवाड, उर्मिला मातोंडकर या मराठी उमेदवारांच्या प्रचारासाठी मनसे मैदानात उतरली असताना मनसेवर वारंवार टीका करणा-या संजय निरूपमना मनसे प्रचारासाठी मदत करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र मनसे निरूपमचा प्रचार करण्यास इच्छुक नसल्याचे मनसेच्या अधिकृत सूत्रांकडून समजते आहे.

लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. मात्रयंदाची निवडणूक ही मोदी विरुद्ध देशअसूनभाजप विरोधी प्रचाराला लागाअसे आदेश राज यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. मुंबईतील प्रत्येक लोकसभा मतदार संघात मनसेची किमान लाख-दीड लाख मतं आहेत. त्यामुळे मनसेचा या निवडणूकीत किती प्रभाव पडू शकतो, याचा अंदाज येऊ शकतो.

मनसे विरुद्ध संजय निरूपम

मनसेची उत्तर भारतीयांविरोधी भूमिका सर्वांना ठाऊक आहे. त्यात निरूपमनीउत्तर भारतीय मुंबई चालवतात. उत्तर भारतीयांनी काम बंद केले तर मुंबई ठप्प होईलअसे वक्तव्य केले होते. यावर मनसेने कडाडून टीका केली होती. तसेच मनसे आणि संजय निरूपम यांच्यामध्ये अनेकदा वाकयुद्ध पहायला मिळाले आहे.

काय आहे मतदार संघाचे चित्र?

उत्तर मुंबई मतदार संघात काँग्रेसने अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला उमेदवारी दिली आहे. अस्खलित मराठीत बोलून उर्मिलाने मराठी मनं जिंकली आहेत. त्याचा फायदा तिला मनसेची मतं जिंकताना होऊ शकतो.

उत्तर मध्य मुंबईत शिवसेनेचे गजानन किर्तीकर यांच्या विरोधात काँग्रेसचे संजय निरूपम उभे आहेत. मनसेने केलेल्या फेरीवाला आंदोलनाच्या वेळी निरूपम यांनी मनसेवर अनेकदा टीका केली आहे. त्यामुळे निरूपम यांना मनसेचे कार्यकर्ते मत देतील असे वाटत नाही, याचा अप्रत्यक्ष फायदा किर्तीकर यांना होऊ शकतो’, असे मत राजकीय विश्लेषक किर्तीकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. ‘राज ठाकरे मोदी-शहा विरोधात जो साधार पुराव्यांसह प्रचार करत आहेत, त्यामुळे समाजात भाजप विरोधात मानसिकता तयार होण्यास हातभार लागणार आहे. ज्याचा लाभ निश्चितच महाआघाडीला होईलअसेही ते पुढे म्हणाले.

ईशान्य मुंबईत राष्ट्रवादीचे संजय दीना पाटील, दक्षिण मध्य मुंबईत काँग्रेसचे एकनाथ गायकवाड, उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या प्रिया दत्त तर दक्षिण मुंबईत मिलींद देवरा यांना मनसेचा निश्चित फायदा होईल.

मागे

किरीट सोमय्यांचा पत्ता कट !  मनोज कोटक यांना भाजपकडून उमेदवारी ?
किरीट सोमय्यांचा पत्ता कट ! मनोज कोटक यांना भाजपकडून उमेदवारी ?

ईशान्य मुंबईचे भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कापल्याचे आता स्पष....

अधिक वाचा

पुढे  

Loksabha 2019: वर्ध्यात मैदान मोकळे असतानाही मोदी म्हणाले…
Loksabha 2019: वर्ध्यात मैदान मोकळे असतानाही मोदी म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्ध्यातील सभेत गर्दी खेचून आणण्यासाठी भा....

Read more