ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

या मतदारसंघात चक्क ‘NOTA’ देतंय दिग्गज उमेदवारांना टक्कर!

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 24, 2019 01:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

या मतदारसंघात चक्क ‘NOTA’ देतंय दिग्गज उमेदवारांना टक्कर!

शहर : मुंबई

राज्य विधानसभेच्या 288 जागांपैकी मराठवाड्यातील 46 जागांच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. यात अनेक दिग्गज उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना रंगला आहे. एकीकडे लातूर शहर आणि ग्रामीण ही देशमुख कुटुंबासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या जागेवर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष असताना मतदारांनी मात्र नोटाला प्राधान्य दिले आहे.

लातूर ग्रामीण मतदारसंघात धिरज देशमुख आघाडीवर असले तरी येथे त्यांना कोणताही उमेदवार नाही तर नोटा टक्कर देत आहे. या मतदारसंघात तब्बल 7 हजार 619 मतदारांनी 'नोटा'चं (None of the Above) बटण दाबलं आहे. विशेष म्हणजे, ही दुसऱ्या क्रमांकाची मते आहेत.

लातूर ग्रामीण हा लातूर तालुक्यातलाच 2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेत तयार झालेला मतदारसंघ. याआधी शिवराज पाटील आणि त्यानंतर विलासराव देशमुख यांच्यामुळं या लातूरवर कायमच कॉंग्रसचे वर्चस्व राहिले आहे. आता याच लातुरच्या ग्रामीण मतदारसंघातून दिवंगत विलासरावांचे चिरंजीव आणि जिल्हा परिषदेचे सदस्य धिरज देशमुख आपले नशीब आजमावत आहेत. याआधी त्यांनी याच भागातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती.

विद्यमान आमदर त्र्यंबक भिसे यांनी 2014मध्ये भाजपच्या रमेश कराड यांना अटीतटीची लढत देत ही जागा आपल्या नावावर केली होती. त्यामुळं यंदा अशीच जादू धीरज दाखवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.धीरज हे ग्रामीणमधून पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. तर अमित दुसऱ्यांदा आपलं नशिब आजमावत आहे.

मागे

पश्चिम महाराष्ट्रात युतीला खिंडार, आघाडी 'पवार'फुल्ल?
पश्चिम महाराष्ट्रात युतीला खिंडार, आघाडी 'पवार'फुल्ल?

नगर जिल्ह्यातील 12 पैकी 8 जागांवर सध्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीवर आहे. तर ....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईचे महापौर विश्वनाथ  महाडेश्वर १६०० मतांनी पराभूत
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर १६०० मतांनी पराभूत

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे वांद्रे विधानसभा मतदार संघातून तब्ब....

Read more