ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लोकांना मुर्ख बनवू नका, राज ठाकरेंचा हल्लाबोल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 10, 2019 09:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लोकांना मुर्ख बनवू नका, राज ठाकरेंचा हल्लाबोल

शहर : मुंबई

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत गुरुवारी दोन सभा घेऊन सरकारवर हल्लाबोल केला. गोरेगावमध्ये झालेल्या सभेत त्यांनी सरकारसोबतच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. 'आरे'च्या प्रश्नावरून त्यांनी उद्धव ठाकरेंना फैलावर घेतलं. 'आरे'तली सर्व झाडं तोडून झाल्यावर उद्धव ठाकरे कारवाई करण्याचं आश्वासन देताहेत. हे लोकांना शुद्ध मुर्ख बनविण्याचा उद्योग चाललाय अशी टीका त्यांनी केली. सरकार तुमचं असताना आश्वासनं काय देता कारवाई का केली नाही असा सवालही त्यांनी केलाय. राज ठाकरे म्हणाले, सरकारच्या थापा आपण ऐकत आलो आहोत. 2014 ला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपण महाराष्ट्राचा विकास आराखडा आणला होता. हे करणारा देशातील एकमेव पक्ष आहे. हा विकास आराखडा आणणार हे मी पक्ष स्थापनेच्या वेळेस मी बोललो होतो आणि तो आणला.

अमित शहा समजदार नेते; 'हमारी मुख्यमंत्री....' घोषणेवर पंकजांनी दिलं उत्तर

राज ठाकरे पुढे म्हणाले, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संबधी देशात मी सोनिया गांधीनापासून ते ममता बॅनर्जी ते शरद पवारांना देखील भेटलो. मी सुचवलं होतं की ह्या मुद्द्यावर आपण निवडणुकांवर बहिष्कार घालावा, हा मुद्दा मी राज्यातील नेत्यांना पण सांगितला, त्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्याच दरम्यान कोल्हापूर आणि सांगली मध्ये महापुराने थैमान घातलं होतं, पक्षाचे आणि इतर काही पक्षांचे कार्यकर्ते मदत कार्यात गुंतले म्हणून मोर्चा पुढे ढकलला, त्यात ईडीची नोटीस आली, त्यावेळेस चौकशी झाल्यावर मी बोललो होतो की 'ईडीची चौकशी लावा काही करा माझं थोबाड बंद होणार नाही"

अजित दादांना विजयी करण्यासाठी सर्व कुटुंबच उतरलं प्रचारात!

ह्या आरेत 2700 झाडं कापली, आणि न्यायालयं देखील सरकारला साजेसं निर्णय देतं, बरं सरकारचे पर्यावरण मंत्री शिवसेनेचे होते, ते ही कत्तल थांबवू शकले नाहीत आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणतात की आम्हाला सत्ता द्या आम्ही आरेला जंगल घोषित करू. आम्हाला मूर्ख समजता का? उद्योगधंदे बंद होत आहेत, बँका बुडत आहेत, बेरोजगारांना काम मिळत नाही आणि सरकार थंड आहे कारण कोणी काही बोलत नाहीये.

मुख्यमंत्री फडणवीस करतात रात्री 12 वाजता फोन, अमित शहांनी सांगितला किस्सा!

काय झालं शिवस्मारकाचं? अहो ह्या महाराष्ट्राला फक्त भूगोल नाही तर इतिहास पण आहे पण ह्या इतिहासाला म्हणजे आपल्या गडकिल्ल्याना सरकार लग्नाला द्यायला निघाले आहेत, तरीही माध्यमं, आणि लोकं थंड बसलेत... विरोधी पक्षाचा नेता सत्ताधारी पक्षात जाऊन बसतोय, नेते इकडून तिकडे सहज उड्या मारत आहेत, आणि आपण सगळे शांतपणे बघत बसलोय. तुमच्या जगण्यातली प्रत्येक गोष्ट कोण निवडून येणार आहे ह्यावर सगळं अवलंबून आहे.

मागे

तुझ्या बापाला जेलमध्ये टाकेल महिला आमदाराला धमकी
तुझ्या बापाला जेलमध्ये टाकेल महिला आमदाराला धमकी

सोलापूर शहर मध्यम मतदारसंघामधून. राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शि....

अधिक वाचा

पुढे  

EDचौकशीनंतर राज ठाकरेंची मुंबईत पहिलीच जाहीर सभा
EDचौकशीनंतर राज ठाकरेंची मुंबईत पहिलीच जाहीर सभा

ईडी चौकशीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील वांद्रे येथे पहिलीच जा....

Read more