ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

प्रज्ञासिंहना कोर्टात हजर राहण्याचा आदेश...

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 19, 2019 12:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

 प्रज्ञासिंहना कोर्टात हजर राहण्याचा आदेश...

शहर : मुंबई

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आजारपणाच्या कारणावरून दिशाभूल करून जामीन मिळविला असल्याने त्यांना निवडणूक लढविण्यास मज्जाव करून खटल्याच्या सुनावणीस रोज हजर राहण्याचा आदेश द्यावा, असा अर्ज येथील एनआयए विशेष कोर्टात करण्यात आलाय. यावर कोर्टाने एनआयए आणि प्रज्ञासिंहना नोटीस काढली असून, पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. प्रज्ञासिंहना भाजपने भोपाळमधून उमेदवारी दिलीय. तर,  निस्सार अहमद सैयद बिलाल या मालेगाव दंगलीतील एकाने हा अर्ज केला आहे. मालेगाव बॉम्बस्फोटांत ठार झालेल्या सहा जणांत बिलाल यांचा मुलगा सैयद अझरही होता.
उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करून घेताना प्रज्ञासिंहनी आपणास स्तनाचा कर्करोग असून, आधाराशिवाय आपल्याला उभेही राहता येत नाही, असे म्हटले होते. साध्वी रिंगणात उतरल्याने त्यांनी दिशाभूल करून जामीन मिळविला, हेच स्पष्ट होते, असा आरोप करून बिलाल अर्जात म्हणतात की, प्रज्ञासिंहना जामीन मिळाला असला तरी सुनावणीस हजर न राहण्याची मुभा दिलेली नाही.

मागे

BSP ऐवजी चुकून BJP समोरील बटन दाबले, मायावतींच्या कार्यकर्त्याने स्वत:चे बोट कापले
BSP ऐवजी चुकून BJP समोरील बटन दाबले, मायावतींच्या कार्यकर्त्याने स्वत:चे बोट कापले

लोकसभा निवडणुकांसाठीचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडले. देशभर....

अधिक वाचा

पुढे  

काँग्रसेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केला शिवसेनेत प्रवेश ...
काँग्रसेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केला शिवसेनेत प्रवेश ...

काँग्रसेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आह....

Read more